Mahavikas Aghadi : दसऱ्याच्या मुहुर्तावर जागावाटप जाहीर करण्याचा मविआचा निर्णय हुकला; काय झाल्या अडचणी जाणून घ्या…

246
Maha Vikas Aghadi चा २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. जवळपास एक महिन्यापासून महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. शनिवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर जागावाटप जाहीर करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता. परंतु हा मुहूर्त आता हुकला आहे. त्याला कारणे देखील काही तशीच आहे. काही जागांसंदर्भात अजूनही एकमत होत नसल्याने हा मुहूर्त महाविकास आघाडीला साधता आला नाही. (Mahavikas Aghadi)
शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे जागावाटप रखडला 
सोमवार ते बुधवार अशा सलग तीन दिवस झालेल्या बैठकांमध्ये जागा वाटप पूर्ण करायचे ठरले होते. १५-२० जागांचा तिढा राहिला तर पक्षश्रेष्ठींकडे विषय पाठवून उर्वरित जागा वाटप जाहीर करायचे असे मविआ नेत्यांनी ठरविले होते. हरियाणात काँग्रेसचा (Congress) पराभव झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याने जागा वाटप रखडल्याचे सांगितले जात आहे. (Mahavikas Aghadi)
मुंबईतील ३६ पैकी अजून ८ जागांचा तिढा कायम असल्याचे मविआतील एका नेत्याने सांगितले. तर विदर्भातील काही जागांवरून अजूनही पेच अडकला आहे. उर्वरित महाराष्ट्रातील जागा वाटप व्यवस्थित पार पडले असल्याचे देखील महाविकास आघाडीतील सूत्रांकडून कळते. विदर्भातील अधिक जागा काँग्रेसला हवे आहेत त्यामुळे आढळूनही एकमत होताना दिसत नाही. काही जागांवर काँग्रेस-उद्धवसेना, काँग्रेस – शरद पवार गट, शरद पवार गट -उद्धव सेना अशा दोन – दोन पक्षांनी दावा सांगितल्याने त्याची चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. असे असले तरी रविवारी महाविकास आघाडीकडनं पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून कळते. (Mahavikas Aghadi)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.