पुण्यातील पोटनिवडणूक महाविकास आघाडीत करणार बिघाडी

122

मागील तीन वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आहे, मात्र या मविआमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण पुण्यातील चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार देण्याची तयारी केली असून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसही तयारी करत आहे, तर दुसरीकडे कसबा मतदार संघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष इच्छूक आहेत. त्यामुळे पुण्यातील या दन पोट निवडणुकीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाकरे गट चिंचवडच्या जागेसाठी आग्रही

कसबा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. चिंचवड पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत मतभेद पहायला मिळत आहेत. ठाकरे गट चिंचवडच्या जागेसाठी आग्रही आहे. तर दोन्ही जागांवर लढण्यासाठी राष्ट्रवादी तयारी आहे. भाजप मात्र, ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. पोटनिवडणूक लढवण्यावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. चिंचवडची जागा लढवण्यासाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चिंचवडची जागा लढवण्यावर चर्चा करण्यात आली. तर कसबा पेठची जागेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड आणि कसबा या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा धीरेंद्र शास्त्री महाराज यांना पोलिसांची क्लीनचीट; अंधश्रद्धा पसरवत नाही तर धर्मप्रसार करतात)

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कसबा पेठसाठी रस्सीखेच

चिंचवडमध्ये लढण्यास ठाकरे गटही इच्छुक आहे असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे चिंचवडवरून शिवसेना राष्ट्रवादीतली रस्सीखेच उघड झाली आहे. पुण्याची कसबापेठची जागा काँग्रेस राष्ट्रवादी यांनी कोण लढणार हे ठरवावे असे राऊत यांनी म्हटले. एकीकडे कसबापेठसाठी काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कसबा पेठसाठी समझौता होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच आता शिवसेनेने चिंचवडवर दावा केल्यामुळे मविआत पोटनिवडणुकीवरून वाद असल्याचे उघड झाला आहे. कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. तर, ज्यांनी अंधेरीची निवडणूक लढवणार म्हणून शिवसेनेचे चिन्ह गोठवले त्यांना सल्ला देण्याचा अधिकार नाही असा टोला देखील ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.