तिसऱ्या ‘परिवर्तन महाशक्ती’मुळे Mahavikas Aghadi चे धाबे दणाणले; ‘Vote Cutting Machine’ चा आरोप

48
तिसऱ्या ‘परिवर्तन महाशक्ती’मुळे Mahavikas Aghadi चे धाबे दणाणले; ‘Vote Cutting Machine’ चा आरोप
  • खास प्रतिनिधी 

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतून नाराज होऊन बाहेर पडलेल्या छोट्या राजकीय पक्षांनी आपली वेगळी चूल मांडली असून या तिसऱ्या ‘परिवर्तन महाशक्ती’ आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाठा या महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) धाबे दणाणले आहेत. उबाठाने तर या आघाडीची घोषणा होताच महाविकास आघाडीसाठी ‘वोट कटींग मशीन’ सत्ताधाऱ्यांकडून बनविण्यात येत असल्याचा आरोप केला.

जरांगेनाही आवाहन

पुण्यात गुरुवारी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी गुरुवारी पुण्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाने तिसरी आघाडी स्थापन करण्यात आल्याचे जाहीर केले. तसेच महाशक्तीचा एकत्रित मेळावा येत्या २६ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होईल, अशी घोषणाही केली. शेट्टी म्हणाले, तिसरी आघाडी ही व एक सक्षम पर्याय म्हणून असेल. छत्रपती संभाजीराजे यांनी तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनाही या आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले.

(हेही वाचा – सिटी पोस्ट ऑफिस कंपाऊंडमध्ये PMC Truck पडला खड्ड्यात; व्हिडिओ झाला व्हायरल)

बदनाम करण्याचे प्रयत्न

या आघाडीमुळे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धडकी भरली असून त्यांचीच मते ही आघाडी खाणार यांची कल्पना आघाडीच्या नेत्यांना आली आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीला बदनाम करण्याचे प्रयत्न शिवसेना उबाठाकडून आज सुरू झाले.

पैशांचा, पदांचा वापर

शुक्रवारी २० सप्टेंबरला सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “तिसरी आघाडी ही कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते. केंद्रात आणि राज्यात जे सत्तेत असताना ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत इतिहास आणि अनुभव हेच सांगतो. विधानसभेला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) लढत आहे, पण महाविकास आघाडीची मतं थोडीफार कमी करण्यासाठी नवीन आघाडी स्थापन करायची आणि त्यासाठी पैशांचा, पदांचा वापर करायचा असे धोरण दिसत आहे.”

राऊत पुढे म्हणाले, “आमच्यासारख्या मजबूत आघाडीची मते खाण्यासाठी सत्ताधारी पक्ष सेकंड फ्रंट, थर्ड फ्रंट, फोर्थ फ्रंट अप्रत्यक्ष बनवतात. तुम्ही बघा थर्ड फ्रंट मध्ये कोण लोक आहेत, ते तर वोंट कटींग मशीन आहेत सगळे,” असा आरोपही राऊत यांनी केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.