आघाडीचा महामोर्चा तर हिंदूंचा विराट मोर्चा; साम्य आणि अंतर!

168

एकीकडे महाविकास आघाडी महापुरुषांचा अपमान केला म्हणून मोर्चे काढत आहे. गंमत म्हणजे महापुरुषांचा अपमान करण्यात आघाडीचा हात कुणीच पकडू शकत नाही. मग राहुल गांधी असोत किंवा सुषमा अंधारे किंवा इतर कोणतेही नेते. सध्या युतीचं सरकार आल्यामुळे आणि महाविकास आघाडीची अनेक प्रकरणे बाहेर आली असल्यामुळे व श्रद्धा-अफताब प्रकरण, गोहत्या, शहरी नक्षलवाद अशा अनेक प्रकरणांवर पडदा टाकण्यासाठी महापुरुषांचा अपमान हे आघाडीने तयार केलेलं नॅरेटिव्ह आहे. तसेच विद्यमान सरकारला अडचणीत आणण्यासाठी दुसरे कोणतेही मुद्दे उपलब्ध नाहीत.

हिंदू आता जागृत झालेले आहेत

युती सरकारने आल्या आल्या वर्क फ्रॉम होम ही राजकारणात नव्यानेच सुरु झालेली संस्कृती संपुष्टात आणली. आणि पुन्हा एकदा ग्राऊंड लेव्हलचं काम सुरु केलं. आपण अडीच वर्षात जे करु शकलो नाही ते काम अडीच महिन्यात करण्याची क्षमता शिंदे-फडणवीस दाखवत आहेत हे शल्य आघाडीच्या नेत्यांना सतावत आहे. दुर्दैवाने या कंपूत नव्यानेच सहभागी झालेले उद्धव ठाकरे हे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनाही हिंदूंच्या समस्या दिसेनाशा झाल्यात. परंतु हिंदू आता जागृत झालेले आहेत. म्हणूनच लव्ह जिहाद विरोधी, गोहत्या, धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्येसारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा यासह विविध मागण्यांसाठी चिंचवडमध्ये हिंदू संघटननांनी विराट मोर्चा काढला. हा हिंदुंचा मोर्चा असल्यामुळे यामध्ये अनेक मंडळे, पक्ष, संस्था, संघटना, कार्यकर्ते व सामान्य हिंदू देखील सहभागी झाले होते. हा मोर्चा नावाप्रमाणे विराट होता हे विशेष. महत्वाचे म्हणजे आघाडीच्या महा मोर्च्याच्या (फडणवीसांच्या भाषेत नॅनो मोर्चा) पार्श्वभूमीवर हा विराट मोर्चा महत्वाचा ठरतो.

(हेही वाचा नागपूरात भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा; लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन)

हिंदूंच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी काढला होता

या दोन्ही मोर्च्यात साम्य आढळत नाही. कारण महाविकास आघाडीने अनेकदा अनेक महापुरुषांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांना महापुरुषांच्या अपमानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. हा मोर्चा महापुरुषांसाठी काढलेला नसून स्वतःची पापे लपवण्यासाठी आणि हिंदूंच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी काढला होता. ह्यात सगळे राजकीय नेते व त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. काही व्हिडिओ व्हायरल झाले त्यानुसार अनेक लोक तर पैसे देऊन आणले होते. म्हणजे कार्यकर्ते देखील प्रामाणित नव्हते. एकंदर हा मोर्चा “अरेंज” केलेला होता. हिंदूंचा विराट मोर्चा म्हणजे सर्व सामान्य हिंदूंचा मोर्चा होता. आणि हा विराट मोर्चा आघाडी संस्कृतीविरोधात होता. स्वयंघोषित पुरोगामी संस्कृती विरोधात होता. त्यांच्या मागण्या प्रामणिक होत्या. आघाडीला आपला मोर्चा कितीही भव्य वाटत असला तरी जनतेला सगळं कळतं आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्याचं उत्तर देखील मिळालेलं आहे. २०२४ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल देखील धक्का लावणारे असतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.