-
मुंबई प्रतिनिधी
महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा १६ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या (Vidhanasabha Election 2024) प्रचाराचा नारळ फोडला. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला पहिला धक्का बसण्याची शक्यता आहे.समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील (Kapil Patil) महाविकास आघाडीची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
आधीपासूनच आला होता दुरावा
मुंबईत काल झालेल्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मेळाव्यात कपिल पाटील हे उपस्थित नव्हते. मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि कपिल पाटील (Kapil Patil) यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. तो दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या उमेदवारासमोर ठाकरे गटाने उमेदवार दिला होता.या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय झाला होता. तर कपिल पाटील यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तेव्हापासून कपिल पाटील महाविकास आघाडीवर पाटील नाराज असल्याचं बोललं जात होतं.
या सर्व पार्श्वभूमीवर कपिल पाटील वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. कपिल पाटील (Kapil Patil) यांनी शनिवारी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. मुंबईत गोरेगावमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. या कार्यक्रमात कपिल पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत. कपिल पाटील हे गोरेगाव विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे कपिल पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. (Mahavikas Aghadi)
कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती बिघडली आहे, महाराष्ट्रात एकोपा सलोखा कायम राहायला हवा हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेच (Raj Thackeray) करू शकतात. त्यांनी पुढाकार घ्यावा याकरता मी सर्व राजकीय नेत्यांची भेट घेतली.शाहु फुले आंबेडकर यांचे विचार कायम राहिले पाहिजे . कालच्या मेळाव्याबाबत मला माहीत नाही, ३ पक्षांची बैठक झाली. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार होते म्हणून बैठक झाली असावी असं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे, त्यामुळे आता कपिल पाटील हे महाविकास आघाडीची साथ सोडणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Mahavikas Aghadi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community