महाविकास आघाडी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थापन झाली. हा एकमेव उद्देश त्यामागे होता. हाच एक कॉमन मिनिमम प्रोग्राम होता. त्यात जनतेचे भले हा फॅक्टर नव्हता. कारण जनतेने युतीला विशेषतः भाजपाला भरघोस मतांनी विजयी केलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी ही जनतेच्या कल्याणासाठी स्थापन झाली नव्हती. वाजे, १०० कोटी खंडणी, दाऊद कनेक्शन, अनंत करमुसे प्रकरण, पालघर साधू हत्याकांड अशा अनेक घटनांमुळे आघाडीने सिद्ध करुन दाखवले आहे.
अडीच वर्षे मनसोक्त सत्ता उपभोगून एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार पडले आहे. आणि आता त्यांच्याकडे गुण्यागोविंदाने नांदण्याचं एकही कारण उरलेलं नाही. अडीच वर्षांनंतर भाजपा सत्तेवर येऊ नये हेच एक कारण त्यांच्याकडे उरलेलं आहे. त्यात उद्धव ठाकरे यांचा काय करावं आणि काय करु नये यात गोंधळ उडतोय.
द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला नाही तर खसदार फुटण्याची शक्यता आहे आणि जर खासदार फुटले आणि शिंदे गटात सामील झाले तर सर्व स्तरावर शिंदे हेच शिवसेना पक्षप्रमुख आहेत हे सिद्ध होईल. म्हणून त्यांना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा लागला. बरं त्याच्याकडे द्रौपदी मुर्मू किंवा भाजपाने पाठिंबा मागितला नव्हता.
आता गंमत अशी झाली आहे की मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने कॉंग्रेस रुसुन बसली आहे. बाळासाहेब थोरात यांचे ट्विट अत्यंत बोलके आहे. “राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत.” बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंना स्पष्ट संदेश दिला आहे. ठाकरेंनी अडचण अशी आहे की इकडे आड तिकडे विहिर. पाठिंबा दिला नाही तर खासदार सोडून जातील, पाठिंबा दिला तर कॉंग्रेस नाराज होईल.
लक्षात घ्या, महाविकास आघाडी नावाची कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाही. ही गोष्ट स्वरुपाला आली, कारण त्यांना नोटबंदीचा डॅमेज कंट्रोल भरून काढायचा होता आणि भाजपाला सत्तेबाहेर ठेवायचं होतं. जे त्यांनी केलं. १०० कोटींची खंडणी आणि वाजे प्रकरणामुळे आपण सत्ता का स्थापन केली याचं प्रात्यक्षिक त्यांनी दिलेलं आहे. आता महाविकासआघाडीची गरज महाविकासआघाडीलाच राहिलेली नाही, ती गरज जनतेला कधीच नव्हती…
Join Our WhatsApp Community