Mahavikas Aghadi फुंकणार विधानसभा प्रचाराचे रणशिंग

Mahavikas Aghadi : आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा षण्मुखानंद सभागृहात संयुक्त मेळावा शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात करणार मार्गदर्शन

199
Assembly Election : उबाठा, शेकापमध्ये रस्सीखेच! इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरु, काँग्रेसचाही दावा
  • मुंबई प्रतिनिधी
 
लोकससभा निवडणूकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आज, शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सकाळी, ११ वाजता षण्मुखानंद सभागृहात संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. लोकसभेतील हे यश आगामी विधानसभा निवडणूकीतही कायम टिकून राहावे, यासाठी आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार असून ’चला निर्धार करूया, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आणूया’ असे आवाहन करणार आहेत. विधानसभेच्या दृष्टिकोनातून या मेळाव्यात रणनीती आखतानाच निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगही फुंकले जाणार आहे. महाविकास आघाडीच्या या मेळाव्याकडे सत्ताधारी पक्षांबरोबरच देशाच्या राजकिय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

(हेही वाचा- Kolkata Rape Case: १७ ऑगस्ट रोजी दवाखाने बंद राहणार, IMAची देशव्यापी बंदची हाक)

लोकसभा निवडणुकीनंतर आघाडीचा हा पहिलाच संयुक्त मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याचे यजमान पद ठाकरेंच्या शिवसेनेकडे असून मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्याला ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शेकापचे जयंत पाटील (Jayant Prabhakar Patil), समाजवादी पक्षाचे अबू आझमी (Abu Azmi) व सीपीएमचे मिलिंद रानडे (Milind Ranade) आदी प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई, ठाण्यातील प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्रातील जिल्हास्तरावरील पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आघाडीच्या पदाधिकाऱ्यांत समन्वय आणि एकजिनसीपणा असावा, यासाठी हा मेळावा घेण्यात आला असून मेळाव्यात प्रचाराचे रणशिंग फुंकले जातील, अशी माहिती शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी दिली. (Mahavikas Aghadi)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.