सध्या महाविकास आघाडीत बरीच धुसफूस सुरु आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना दिलेला सल्ला यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीत महाविकास आघाडी टिकेल का, अशी चर्चा सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सगळ्याच प्रश्नांचा खुलासा केला.
नागपुरातील वज्रमूठ सभेला उपस्थित राहणार
भाजप करत असलेल्या राजकारणामुळे आता पाणी डोक्यावरून गेले आहे, त्यामुळे आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत आणि 2024 पर्यंत एकत्र राहणार आहोत, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. ज्या मुख्यमंत्रीपदामुळे युतीमध्ये फूट पडली त्याच मुद्द्यावरून विरोधकांमध्ये वज्रफूट तर पडणार नाही ना? या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याच पक्षाचा मुख्यमंत्री, असे मोठे वक्तव्य नाना पटोले यांनी केले. त्याबरोबर 2019 मध्ये जो कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला होता, त्याचे ठराविक मुद्देही त्यांनी नाना पटोले यांनी मांडले. दरम्यान नागपूर शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावना नगर इथल्या मैदानावर महविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्या सभेला आपणही उपस्थित असणार आहे, असेही पटोले म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा झाली, त्या सभेला नाना पटोले गैर हजर होते, त्यावेळी बरीच उलटसुलट चर्चा झाली होती.
(हेही वाचा धोका वाढला, काळजी घ्या! गेल्या ११ दिवसांत राज्यात कोरोनाचे ३० बळी)
Join Our WhatsApp Community