महाविकास आघाडी राज्यभर सभा घेणार, काय आहे योजना?

135

सत्ताधाऱ्यांविरोधातील रणनिती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीने मुंबईत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला संबोधित करताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या सर्व सभा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. महाविकास आघाडीच्या सर्व सभा आणि बैठकांचे नियोजन करण्यासाठी १५ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली.

( हेही वाचा : धक्कादायक! पुण्यात पत्नी अन् मुलाचा खून करून पतीची आत्महत्या )

महाविकास आघाडीचा प्रसार सर्वदूर व्हायला पाहिजे. यासाठी प्रत्येक शहरातील सभेसाठी जोरदार नियोजन करा. असे पवारांनी यावेळी सांगितले. २ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे सभा होणार असून अंबादास दानवे नेतृत्वात ही सभा होईल.

  • १ मे रोजी मुंबईत सभा होणार असून यासाठी आदित्य ठाकरे नेतृत्व करणार आहेत.
  • १४ मे रोजी पुण्यातील सभेची जबाबदारी अजित पवारांनी स्वत: घेतली आहे.
  • २८ मे रोजी कोल्हापूरात सतेज पाटील यांच्या पुढाकारात सभा होणार आहे.
  • ३ जूनला नाशिकला छगन भुजबळ यांच्या पुढाकारात सभा होणार आहे.
  • ११ जूनला अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात सभा होणार आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

सभा यशस्वी करण्याची आपली सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. सर्वांचे प्रतिनिधी दिसले पाहिजे. जी सभा सर्वात मोठी त्यांना बक्षिस मिळेल. महाविकास आघाडी एकत्रित आली की काय होऊ शकते हे विधानपरिषद निवडणुकीतून पहायला मिळाले आहे. कसब्यात २८ वर्ष भाजपचा गड होता, तो गड पडला तेव्हा ते खडबडून जागे झाले. जसे सरकार आले ते सामान्य माणसाला आवडले नाही. आपल्याला महाविकास आघाडीच्या सभा घेत असताना एकोप निर्माण करण्याचे काम केले पाहिजे असे विरोधीपक्षनेते अजित पवार महाविकास आघाडीच्या सभेमध्ये म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.