“महाविकास आघाडीचा जाहीरनामा म्हणजे अफवा, ते विकास करणार नाहीत” – भाजपा नेते Chandrashekhar Bawankule

98
“महाविकास आघाडीचा जाहीरनामा म्हणजे अफवा, ते विकास करणार नाहीत” - भाजपा नेते Chandrashekhar Bawankule
“महाविकास आघाडीचा जाहीरनामा म्हणजे अफवा, ते विकास करणार नाहीत” - भाजपा नेते Chandrashekhar Bawankule

राज्यात विधानसभा निवडणुकांची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसत आहे. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या मार्फत महाविकास आघाडीने रविवार १० नोव्हेंबर रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला. मात्र, मविआचा जाहीरनामा अफवा असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (Chandrashekhar Bawankule)

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा अफवा असून ते विकास करणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या जाहीरनाम्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. काँग्रेस लाडकी बहीण योजनेसाठी 3 हजार रुपये देणार असल्याचे म्हणत आहे. पण काँग्रेसवाले खोटारडे आहेत. ही योजना बंद करण्यासाठी ते कोर्टात गेलेत. आम्हाला असल्या योजना परवडणार नाहीत, असे विजय वडेट्टीवारांसह (Vijay Vadettiwar) अनेक नेते बोलले आहेत आणि आता तेच योजना परत आणत आहेत, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला. तर आमचे बजेट तयार असून रस्ते, वीज, पाण्यासाठी आम्ही केंद्राकडून पैसे आणू, असे विधान चंद्रकांत बावणकुळे यांनी केले. 

(हेही वाचा – Assembly Election 2024: ठाण्यात निवडणूक कर्तव्य नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उगारला जाणार कारवाईचा बडगा)

खासदार महाडिकांच्या विधानावर काय म्हणाले बावनकुळे?

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपा खासदार धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरही प्रतिक्रिया दिली आहे. महिलांबाबत असे बोलणे चुकीचे आहे. त्यांनी त्या वक्तव्याचे खंडन करून माफी देखील मागितली आहे. भाजपाच्या नेत्यांनी यापुढे अशी वक्तव्ये करू नयेत, असा सल्ला बावनकुळे यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर (MVA Manifesto) कोणीही विश्वास ठेवणार नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.