विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर मागील दोन दिवस अनेक एक्झिट पोलने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यात बऱ्याच एक्सिट पोलमधून महायुतीचे सरकार येणार असल्याचे म्हटले आहे, पण निकालाच्या काही तास आधी अचूक अंदाज बांधण्याची कसब असलेल्या C-Voter चा Exit Poll आला आहे. त्यामध्ये चक्रावून टाकणारे अंदाज बांधण्यात आले आहेत.
या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात केवळ १ टक्का मतांचे असेल. त्यांच्यामधील जागांची तफावत केवळ ८ जागांची असेल. तर ६१ जागा या निर्णायक ठरतील, ज्यावर अटीतटीचे लढत होणार आहे. याच ६१ जागा राज्यात कोणाचे सरकार येणार याचा निकाल लावतील, अशी आकडेवारी C-Voterचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी मांडली.
(हेही वाचा राहुल गांधी, खरगे आणि सुप्रिया श्रीनेट यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा ठोकणार; Vinod Tawde यांचा इशारा)
महायुतीला ४१ टक्के मतांसह ११२ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला ४० टक्के मतांसह १०८ जागा मिळण्याची शक्यता म्हटली आहे. महाराष्ट्रातील पाच विभाग पाच राज्यांप्रमाणे आहेत. तिथली परिस्थिती वेगळी आहे, असे यशवंत देशमुख यांनी सांगितले. ‘मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात महायुतीला व्होट शेअरच्या बाबतीत मोठी आघाडी आहे. तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात महाविकास आघाडीकडे मोठ्या अंतराने पुढे आहे. पण विदर्भात परिस्थिती वेगळी आहे. व्होट शेअरच्या बाबतीत इथे काँटे की टक्कर आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष कोण असेल, कोणाला बहुमत मिळेल, यामध्ये विदर्भाची भूमिका निर्णायक असेल, असे विश्लेषण देशमुख यांनी केलं. C-Voter
Join Our WhatsApp Community