Mahayuti : भाजपाकडून अजित पवारांना बाजूला करण्याचा प्रयत्न?

207
Mahayuti च्या कोणत्या जागांवर खरी रस्सीखेच, कुरघोडी होणार?

गेल्या तीन-चार दिवसांत भाजपाच्या दोन प्रमुख नेत्यांनी राज्यातील विधानसभेच्या २८८ जागा भाजपाने लढण्याची तयारी केली असल्याची वक्तव्ये करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवण्याची एकप्रकारे तयारी सुरू असल्याचे संकेत दिले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Mahayuti)

राणेंच्या विधानाला पाटलांचे समर्थन

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना ‘भाजपाने २८८ जागा लढवाव्या’ असे सांगून एकच खळबळ उडवून दिली. त्याची चर्चा सुरू असताना सोमवारी २९ जुलैला भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही भाजपाची २८८ जागा लढण्याची तयारी असल्याचे वक्तव्य करून एकप्रकारे राणे यांच्या विधानाला समर्थनच दिले आहे. (Mahayuti)

शिवसेना आणि राष्ट्रवादीशिवाय स्वबळावर?

पाटील यांनी राणे यांच्या विधानाला समर्थन दिल्याने महायुतीतील शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीला केवळ बाहेरून समर्थन देईल, असे होणे शक्य नाही. याचा स्पष्ट अर्थ असा निघतो की, भाजपा विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादीशिवाय स्वबळावर लढवणार. (Mahayuti)

(हेही वाचा – बाल गुन्हेगार व्याख्येत गोंधळ असल्याने गुन्हेगारांना होतोय फायदा; Praveen Dixit यांनी मांडले वास्तव)

शिवसेनेबद्दल आरएसएसचा आक्षेप नाही

आणखी एक शक्यता अशी की, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) विरोध केल्याने भाजपा राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेर काढण्यासाठी पूरक पार्श्वभूमी तयार करीत आहे. ‘आरएसएस’चा आक्षेप केवळ राष्ट्रवादीबद्दल असून शिंदे यांच्या शिवसेनेशी भाजपाशी नैसर्गिक युती असल्याने शिवसेनेला सोबत घेण्यास आरएसएसचा विरोध नाही, असा एक सूर महायुतीत ऐकू येत आहे. (Mahayuti)

राष्ट्रवादीऐवजी मनसे महायुतीत?

महायुतीतून राष्ट्रवादी बाहेर पडल्यास २८८ पैकी भाजपा १८० तर शिंदे यांची शिवसेना १०० पर्यंत जागा लढून ७-८ जागा लहान पक्षांच्या वाट्याला देऊ शकते. तर दूसरा पर्याय, भाजपा १५०, शिवसेना ८० आणि मनसेला सोबत घेऊन ४५-५० जागा मनसे आणि उर्वरित घटक पक्षांना देत, महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणे, यावर विचारमंथन होऊ शकते, असे सांगण्यात आले. अर्थात, असा प्रस्ताव सामोर आला आणि सर्व पक्षांचे एकमत झाले तर राष्ट्रवादीऐवजी मनसे महायुतीचा भाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Mahayuti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.