Mahayuti : अजित पवार नमती भूमिका घेणार; फक्त ७५ जागांची मागणी करणार

133
Mahayuti : अजित पवार नमती भूमिका घेणार; फक्त ७५ जागांची मागणी

विधानसभा निवडणूक जागावाटपावरून महायुतीत (Mahayuti) मतभेद असले तरी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून बाहेर पडणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. पवार यांनी २८८ पैकी ७५ जागा तसेच ४-५ जागांवर आदलाबदली करण्याची लवचिकता दाखवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

निवडणूक अधिक रंगतदार

विधानसभा निवडणुकीसाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असली तरी मनसे आणि वंचित बहुजन आघाडी तसेच तिसरी आघाडी झाल्यास, निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

(हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नाकासमोरच Shivaji Park ला केले जाते विद्रुप)

७५ मागणी ६०-६५ वर तडजोड

महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली असताना महायुतीतील भाजपा, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसने समन्वयाची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. महायुतीतील (Mahayuti) सगळ्यात मोठा पक्ष भाजपा १५०-१६० जागा लढण्याची शक्यता असून शिवसेना (शिंदे) ६०-७० आणि राष्ट्रवादी ६०-६५ जागा लढू शकेल असे सूत्रांकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादीकडून मात्र ७५ जागांची मागणी केली जात असून ६०-६५ वर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच त्यातही ४-५ जागा बदली होण्याची शक्यता पवार यांनीच व्यक्त केली आहे.

नेते सांभाळणे तारेवरची कसरत

अजित पवार यांच्यावर त्यांच्या पक्षातून वाढीव जागांसाठी प्रचंड दबाव असला तरी सत्तेत राहायचं असेल तर भाजपासोबत जुळवून घेण्याची घ्यावे लागेल, अशी भूमिका अजित पवार यांनी पक्षातील नेत्यांकडे व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे छगन भुजबळ यांनी ८०-९० जागांची मागणी करण्याची भाषा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी लागणार आहे. भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांना महायुतीत टिकवून ठेवणे ही अजित पवार यांच्यासाठी खरी तारेवरची कसरत असेल, असे एका नेत्याने स्पष्ट केले. (Mahayuti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.