विधानसभा निवडणुकीत महायुतीतील (Mahayuti) जागा वाटापाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार, २९ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. ए बी फॉर्म सर्वांना वाटण्यात आले आहेत. त्यानुसार महायुतीमध्ये भाजपा १४८, शिवसेना शिंदे गट ८५, राष्ट्रवादी अजित पवार गट ५१ आणि इतर ४ जागा लढवणार आहेत.
(हेही वाचा आर आर आबांनी माझी चौकशी करण्यासाठी सही केली; केसाने गळा कापला; Ajit Pawar यांचा गौप्यस्फोट)
महायुतीमध्ये (Mahayuti) भाजपाने पहिल्या यादीत ९९, दुसऱ्या यादीत २२, तिसऱ्या यादीत २५ आणि शेवटच्या यादीत २ अशी एकूण १४८ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने पहिल्या यादीत ४५, दुसऱ्या यादीत २०, तिसऱ्या यादीत १३ आणि शेवटच्या चौथ्या यादीत ७ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पहिल्या यादीत ३८, दुसऱ्या यादीत ७, तिसऱ्या यादीत ४ आणि शेवटच्या यादीत २ उमेदवारांची घोषणा केली आहे. याशिवाय महायुतीने आपल्या मित्र पक्षांना ४ जागा दिल्या आहेत. अशा प्रकारे महायुतीचे (Mahayuti) जागावाटप उमेदवारीअर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पूर्ण झाले आहे. भाजपाने २०१९ मध्ये १६४ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाला १०५ जागा मिळाल्या होत्या मात्र यावेळी भाजपाने मित्रपक्षांसाठी तडजोडी करत १६ जागा सोडल्या आहेत.
Join Our WhatsApp Community