महायुतीचा मोठा डाव ! Vidhan Parishad Election जिंकण्यासाठी हॉटेल डिप्लोमसी

अंबानींच्या चिरंजीवांच्या विवाह सोहळ्यामुळे राजकीय पक्षांना हॉटेल मिळेनात

147
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निकालानंतरच राज्यात नवी राजकीय समीकरणे

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे. विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने मोठा डाव टाकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये थांबणार आहेत, तर भाजपचे आमदार हॉटेल ताज प्रेसिडेन्सीमध्ये थांबणार आहेत. आपल्या आमदारांसाठी एकनाथ शिंदे यांनी ६० रूम्स बूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर उबाठाने परळच्या आयटीसी हॉटेलमध्ये आपल्या आमदारांची व्यवस्था केली आहे. (Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – Pune Crime : पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास होणार मोठी कारवाई; पोलिसांचा मोठा निर्णय)

अंबानींच्या चिरंजीवांच्या विवाह सोहळ्यामुळे राजकीय पक्षांना हॉटेल मिळेनात

१२ जुलै रोजी विधान परिषदेची निवडणूक असली, तरी त्याच दिवशी अंबानी यांच्या चिरंजीवाचा विवाहसोहळा देखील आल्याने येणाऱ्या महत्त्वाच्या, तसेच अत्यंत महत्त्वाच्या परदेशी पाहुण्यांसाठी मुंबईतील विमानतळालगतची, तसेच मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स बुकिंग आधीपासून झाली आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील महत्त्वाच्या हॉटेल्सच्या सर्व रुम्स बूक झाल्या आहेत, याच कारणामुळे अजित पवार गटाला हॉटेल सापडले नाही. (Vidhan Parishad Election)

विधान परिषदेआधी आमदारांची फोडाफोड होऊ नये, यासाठी सर्वच पक्ष खबरदारी घेताना दिसत आहेत. निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. (Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – Maratha OBC Reservation वरून विधिमंडळात आरोप-प्रत्यारोप; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब)

सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गटाकडून फोर सिझन्स किंवा ललित हॉटेलची चाचपणी सुरू झाली असून यातील एका हॉटेलमध्ये अजित पवार गटाचे आमदार थांबण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत घोषणा आज दुपारपर्यंत होईल. दरम्यान, महायुतीचे ९, तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात असून एकूण ११ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. याच कारणामुळे निवडणुकीदरम्यान क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Vidhan Parishad Election)

महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, या दोन्हीकडून मतांची जुळवा जुळवा करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे एक मोठे आव्हान वरिष्ठ नेत्यांसमोर असेल. त्यामुळे आता मतांची जुळवाजवळ नेमकी कशी ? कोणाला किती मतं मिळणार?, असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. (Vidhan Parishad Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.