महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल; Raj Thackeray यांचा विश्वास

74

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, पण एवढही सोप नाही. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होईल, पण आमच्या साथीनेच, असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

सध्याच्या राजकारणाला शरद पवारांनी केली सुरुवात 

1978 ला शरद पवारांनी जर अशा राजकारणाची सुरुवात केली नसती तर हा उद्योग कोणालाच सुचला नसता. नारायण राणे हे पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार होते, पण बाहेर पडल्यावर शरद पवारांनी हात वर केले. त्यानंतर राणे काँग्रेसमध्ये गेल्याचे राज ठाकरे म्हणाले. हे सगळे शरद पवारांनीच सांगितल्याचेही राज  ठाकरे म्हणाले. शरद पवारांनी सुरु केलेल्या गोष्टीची पुढे सवय होत गेली. आज महाराष्ट्रातील परिस्थिती खूप लाजीरवाणी झाली आहे. कोण कुठेही जात आहे. ही निवडणूक मतदारांच्या मतांच्या अपमानाचा बदला घेण्याची असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

(हेही वाचा Blinkit Scam : दिल्लीच्या एका तरुणाची ब्लिंकइटवर फसवणूक, १ ग्रॅम सोन्याच्या ऑर्डरवर मिळालं अर्धा ग्रॅम सोनं)

महाराष्ट्र फोडाफोडीच्या राजकारणातून बाहेर येईल 

कोणत्याही पक्षाच्या बाबतीत अशा गोष्टी होता कामा नये. मी शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळी मी पक्ष फोडला नाही. मला पक्षातून इतर नेते फोडून पक्ष निर्माण करायचा नव्हता. मला वेळ लागला तरी चालेल, पण महाराष्ट्र आताच्या परिस्थितीतून बाहेर येईल. महाराष्ट्रावर खोलवर संस्कार झाले आहेत. यातून महाराष्ट्र बाहेर येईल. महाराष्ट्र खूप मोठा आहे, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. महाराष्ट्रातील सगळ्या पुतण्यांना घेऊन छगन भुजबळांनी एक पक्ष काढावा. भुजबळ देखील पुतण्याबरोबरच गेले. काकांबरोबर कुठे राहिले, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.