Mahayuti आणि MNS विधानसभेलाही एकत्र?

72
Mahayuti आणि MNS विधानसभेलाही एकत्र?
  • सुजित महामुलकर

भाजपा-शिवसेना (शिंदे)-राष्ट्रवादी अजित पवार यांची महायुती (Mahayuti) आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष गेल्या लोकसभा निवडणुकीत एकत्र होते. मनसेने लोकसभा निवडणुकीसाठी एकही उमेदवार उभा न करता महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. मात्र आता जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे आणि महायुती एकत्र आहे की नाही, याबाबत अजूनही संभ्रम आहे. हा संभ्रम मंगळवारी २९ ऑक्टोबर २०२४ ला नक्की दूर झालेला असेल.

तीनही यादीत ‘ते’ तीन मतदारसंघ नाहीत

मनसेकडून तीन उमेदवार याद्या जाहीर झाल्या. या तीन याद्यांमध्ये एकूण ६५ उमेदवारांची घोषणा पक्षाने केली. पहिली यादी सात उमेदवारांची होती तर दुसऱ्या यादीत ४५ आणि तिसरी यादी १३ उमेदवारांची होती. विशेष म्हणजे या याद्यांमध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून अविनाश जाधव, कोथरूड मतदारसंघातून किशोर शिंदे, कर्जत-जामखेडमधून रवींद्र कोठारी, नागपूर दक्षिण मधून आदित्य दुरुगकर असे काही प्रमुख मतदारसंघ आणि उमेदवार जाहीर केले. मात्र या तीनही यादीत कोपरी-पाचपाखाडी, नागपूर दक्षिण-पश्चिम आणि बारामती या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश नाही. (Mahayuti)

(हेही वाचा – Veer Savarkar : वीर सावरकरांच्या कार्याचा प्रचार-प्रसार करणाऱ्या Manjiri Marathe यांचा ‘समाजभूषण पुरस्कारा’ने गौरव)

का महत्त्वाचे आहेत?

असं काय महत्त्व आहे, या तीन विधानसभा मतदारसंघात? या तीन मतदारसंघाचे वैशिष्ठ्य म्हणजे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत करतात, नागपूर दक्षिण-पश्चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बारामती मतदार संघाचे प्रतिनिधित्व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभेत करत आहेत. (Mahayuti)

छुपा समझोता की ताकद नाही?

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ ला मतदान होणार आहे तर निकाल २३ ऑक्टोबरला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २२ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली असून मंगळवारी २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे तर मागे घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत आहे. ज्या ‘हाय-प्रोफाइल’ तीन मतदारसंघांचा उल्लेख वर केला गेला त्या मतदारसंघात मंगळवारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही तर त्याचा एक अर्थ असा निघू शकतो की ‘मनसे आणि महायुतीत काही छुपा समझोता झाला असावा’ तर दुसरी शक्यता अशी की ‘या तीनही मतदारसंघासाठी मनसेकडे ताकदीचा उमेदवारच नसावा’. (Mahayuti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.