
- प्रतिनिधी
महाराष्ट्रातील बळीराजाला दिलेली कर्जमाफीची आश्वासने महायुतीच्या (Mahayuti) वचननाम्यानुसार पूर्ण करणे ही महायुतीची नैतिक जबाबदारी आहे. महायुतीमध्ये याबाबत कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांमध्ये प्रसारित खोडसाळ बातम्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.
परांजपे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीला विरोध केला असल्याच्या खोट्या बातम्या काही माध्यमांमध्ये पद्धतशीरपणे पसरवल्या जात आहेत. हे पूर्णपणे असत्य असून, शेतकऱ्यांना दिलेली वचनं पाळण्यास महायुती कटीबद्ध आहे.
(हेही वाचा – Hill Stations : महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि शांत हिल स्टेशन कोणते?)
अजित पवारांच्या बैठका आणि अर्थसंकल्पीय तयारी :
गेल्या दहा दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थ व वित्त नियोजन मंत्री म्हणून राज्यातील सर्व विभागांच्या खात्यांचा आढावा घेत आहेत. प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांसोबत, सचिवांसोबत, तसेच उपसचिवांसोबत त्यांनी झालेल्या खर्चाचे तपशीलवार परीक्षण केले आहे. मार्चमध्ये जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल, तेव्हा महायुतीच्या (Mahayuti) वचननाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण झालेली दिसतील, असेही परांजपे यांनी सांगितले.
(हेही वाचा – स्वच्छ परिसरासोबत १०० दिवसांत १०० शौचालय दुरुस्तीची मोहिम; केंद्रीय मंत्री Piyush Goyal यांचा संकल्प)
शेतकऱ्यांचा विकास केंद्रस्थानी :
राष्ट्रवादी काँग्रेससाठी बळीराजा हा नेहमीच विकासाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. कर्जमाफीसंदर्भात खोट्या बातम्या पसरवून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न टाळावा, अशी कळकळीची विनंती आनंद परांजपे यांनी माध्यमांना केली आहे.
महायुती (Mahayuti) सरकार आपल्या वचनांवर ठाम असून, बळीराजाच्या कल्याणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community