Mahayuti Rally in Mumbai : बीकेसीत झालेल्या महायुतीच्या रॅलीत ‘लाल इमली मिल’चे पत्रक भिरकावले; डॉक्टरला अटक

115
Mahayuti Rally in Mumbai : बीकेसीत झालेल्या महायुतीच्या रॅलीत 'लाल इमली मिल'चे पत्रक भिरकावले; डॉक्टरला अटक
Mahayuti Rally in Mumbai : बीकेसीत झालेल्या महायुतीच्या रॅलीत 'लाल इमली मिल'चे पत्रक भिरकावले; डॉक्टरला अटक

बीकेसी (BKC) येथे रविवार १० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या महायुतीच्या संकल्प पत्र विमोचन समारोहात बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या कानपूर येथील डॉक्टरला बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. शक्ती भार्गव (५२) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने या समारोहाच्या ठिकाणी एका हिंदी वृत्तपत्राच्या ओळखपत्रावर प्रवेश मिळवून छापील पत्रके समारोहात उधळल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान रविवारी झालेल्या गोंधळानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मंगळवारी मुंबईत होणाऱ्या रॅलीत सुरक्षा वाढविण्यात आली आहे. (Mahayuti Rally in Mumbai)

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra Kurla Complex) येथे रविवारी महायुतीच्या संकल्प पत्राचे विमोचन पार पडले, या विमोचन सोहळ्यात देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपाचे नेतेमंडळी हजर होती. या विमोचन सोहळ्याला पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते, या दरम्यान कानपूरचे सर्जन डॉ. शक्ती भार्गव (५२) यांनी एका राष्ट्रीय हिंदी दैनिकाचे ओळखपत्र तयार करून या कार्यक्रमात प्रवेश मिळवला होता. (Mahayuti Rally in Mumbai)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : अहिल्यानगर जिल्ह्यात विखे-पाटील, थोरातांची प्रतिष्ठा पणाला!)

विमोचन सोहळा कार्यक्रम सुरू असताना भार्गव याने सोबत आणलेले छापील पत्रके व्यासपीठाच्या दिशेने अचानक भिरकावल्याने एकच गोंधळ उडाला, भिरकावले पत्रके हे कानपूर येथील ‘लाल इमली मिल की दुःखद कहाणी, प्रॉपर्टी घोटाला, १८ आत्महत्या, ४० कर्मचारी की असमय मौत,’ असा मजकूर लिहलेले हे पत्रकासह पोलिसांनी डॉक्टर शक्ती भार्गव याला ताब्यात घेण्यात आले होते, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Mahayuti Rally in Mumbai)

भार्गवने बनावट आयडी तयार करून पत्रकार परिषदेत प्रवेश कसा केला याचा तपास सुरू करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान आरोपीने कोणताही गोंधळ घातला नसल्याची माहिती एका पोलीस अधिकारी यांनी दिली. मंगळवारी मुंबईत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची रॅली होणार असून त्यांच्या रॅलीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाह यांच्या मुंबई दौरा संपेपर्यंत अधिकाऱ्यांनी सुरक्षा उपाययोजना मजबूत केल्या आहेत. (Mahayuti Rally in Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.