- सुजित महामुलकर
राज्यात एकीकडे निवडणूक (Election) प्रचारातून राजकीय वातावरण तापत चालले असताना, उष्णतेचा पाराही चढत आहे. गेल्या वर्षी म्हणजेच १२ एप्रिल २०२३ ला राज्यात केवळ ७५ टँकरने पाणी पुरवठा होत होता, तो आज १२ एप्रिल, २०२४ ला २,०९३ टँकरच्या माध्यमातून होत आहे. सत्तेतील महायुती (Mahayuti) सरकारने संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीवर वेळीच तोडगा काढला नाही तर महायुतीला (Mahayuti) ७ ते २० मे दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतांच्या दुष्काळाचा सामना करावा लागेल. (Mahayuti)
(हेही वाचा- इफ्तार पार्टीसाठी दुकानात आलेला Munaawar Farooqui दंगा झाल्यानंतर पळाला !)
मतदानाचे दोन टप्पे याच महिन्यात
२०२४ च्या तुलनेत, गेल्या वर्षी (२०२३) याच दिवशी ७० गावे आणि २०४ वाड्यांना केवळ ७५ टँकरने पाणी पुरवठा होत होता. तर यावर्षी १,६६६ गावे आणि जवाळपास ४,००० वाड्यांसाठी २,०९३ टँकर पाणी पुरवठ्याच्या कामाला लागले आहेत. यांचा अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याची परिस्थिति भीषण असून एप्रिलमध्ये दोन टप्प्यात १९ आणि २६ एप्रिलला निवडणुका होऊ घातल्या आहेत तर मे महिन्यात ७, १३ आणि २० मे अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. (Mahayuti)
धरणांमधील पाणीसाठा ३३ टक्के
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच संपूर्ण राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा ३३.३८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. शिंदे-फडणवीस-पवार (Shinde-Fadnavis-Pawar) सरकारने संभाव्य भीषण पाणीटंचाई किंवा दुष्काळसदृश परिस्थिति संवेदनशीलपणे न हातळल्यास महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Mahayuti)
टॅंकरची स्थिति
बुलढाणा विभागातील गांवांमध्ये सध्या ३५ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून बुलढाण्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला होत आहे. तर तिसऱ्या टप्प्यात ऐन मे महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मतदान होणार आहे. येथील रायगड-१९, रत्नागिरी-३, सातारा-१६०, सांगली-८४, सोलापूर-६३ आणि धाराशीव-६६ अशी टँकरची आकडेवारी राज्य शासनाकडून देण्यात आली. याप्रमाणे चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे ला मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आहे, जिथे छत्रपती संभाजीनगर-४४३, जळगाव-७८, नगर १५८, पुणे-११६, जालना-३४३, बीड-१९९ असा टँकर पाणीपुरवठा होतो. शेवटच्या टप्प्यात मुंबई आणि आसपासच्या परिसरात म्हणजेच ठाणे, पालघर आणि नाशिक हे पाणी टंचाई असलेले जिल्हे आहेत. या ठिकाणी पाचव्या टप्प्यात २० मे ला मतदान होत आहे तर टँकरची स्थिति ठाणे-३२, नाशिक-२३८ आणि पालघर-३० अशी आहे. (Mahayuti)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community