Mahayuti चा नाराज घटक पक्ष Uddhav Thackeray ना भेटणार

Mahayuti : राज्यात मराठाबरोबरच धनगर समाजाची मते मोठ्या प्रमाणावर असून जानकर धनगर समाजाच्या एका मोठ्या गटाचे नेतृत्व करतात.

286
Mahayuti चा नाराज घटक पक्ष Uddhav Thackeray ना भेटणार
Mahayuti चा नाराज घटक पक्ष Uddhav Thackeray ना भेटणार

महायुतीत (Mahayuti) नाराज असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) (Rashtriya Samaj Paksha) या घटक पक्षाने अखेर वेगळी वाट घेत महाविकास आघाडीशी समझोता करण्याची तयारी केली आहे.(Mahayuti)

गेल्या आठवड्यात ‘हिंदुस्थान पोस्ट’ने महायुतीतील(Mahayuti) घटक पक्ष नाराज असल्याची बातमी दिली होती. यात रासप तसेच बच्चू कडू यांच्या प्रहार जनाशक्ती पक्षाचा समावेश असल्याचे नमूद केले होते.(Mahayuti)

(हेही वाचा- Gunaratna Sadavarte: मनोज जरांगेंना नैराश्य आलंय, गुणरत्न सदावर्तेंनी केली कडाडून टीका )

रासपप्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर उद्या शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याचे समजते. जानकर हे माढा या लोकसभा मतदार संघातून (Madha Lok Sabha Constituency) निवडणूक लढण्यास इच्छुक असून यासाठी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पाठींबा मिळवण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत.(Mahayuti)

जानकर माढातून लढणार

रासप राज्यातील सर्व ४८ जागांवर उमेदवार उभे करणार असून जानकर स्वतः माढा आणि परभणी या दोन मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. “सांगलीमधून कालिदास गाढवे, नगरमधून रवींद्र कोठारी तसेच मध्य प्रदेशमधून २२ जागा, उत्तर प्रदेशमध्ये ७१, गुजरातमध्ये (Gujarat) ६, कर्नाटकात (Karnataka) १२ आणि गोवा (Goa) राज्यात एक जागा लढवणार आहे,” असे जानकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले होते.(Mahayuti)

धनगर समाजाचे नेतृत्व

राज्यात मराठाबरोबरच धनगर समाजाची मते मोठ्या प्रमाणावर असून जानकर धनगर समाजाच्या एका मोठ्या गटाचे नेतृत्व करतात. २०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये जानकर यांना मंत्रिपद देण्यात आले होते. राज्यात सद्या रासपचा एक आमदार असला तरी मतविभागणी झाल्यास त्याचा फटका महायुतीला बसू शकतो.(Mahayuti)

जानकरांकडून इन्कार 

दरम्यान, जानकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्या भेटणार असल्याचा वृताचा इन्कार केला. ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना जानकर म्हणाले, “मी उद्या मुंबईतच नाही त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्नच नाही. शरद पवार यांची भेट झाली मात्र निवडणुकीबाबत काही चर्चा झाली नाही.”

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.