Mahim Dadar Assembly Constituency : शिवसेना भवनाच्या अंगणात शेलारांच्या भेटीगाठी वाढल्या

202
Mahim Dadar Assembly Constituency : शिवसेना भवनाच्या अंगणात शेलारांच्या भेटीगाठी वाढल्या

दादर माहिम विधानसभा मतदारसंघाकडे आता भाजपाचा डोळा असून एका बाजूला विद्यमान आमदार सदा सरवणकर पुन्हा एकदा निवडणूक जिंकण्यासाठी वातावरण निर्मित करत असतानाच मनसेकडून नितीन सरदेसाई यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु आता महायुतीमध्ये या मतदार संघ भाजपा स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न सुरु असून खुद्द भाजपाचे मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांना हा मतदारसंघ खुणावत आहे. त्यामुळे दोन निवडणुकांपूर्वी शिवसेना भवनाच्या अंगणात निवडणूक लढवण्याची इच्छा प्रकट करणाऱ्या आशिष शेलार यांचा या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी-गाठी सध्या खूप काही सांगून जात आहेत. (Mahim Dadar Assembly Constituency)

दादर व माहिम विधानसभा मतदारसंघात श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष व आमदार सदा सरवणकर हे असून यापूर्वी दादर आणि माहिम हे दोन स्वतंत्र विधानसभा क्षेत्र असले तरी सन २००९ पासून हे दोन्ही मतदारसंघ एक झाले आहेत. त्यामुळे सन २००९ वगळता सलग दोन वेळा सदा सरवणकर हे आमदार म्हणून निवडून येत आहेत. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे हे आमदार असल्याने या मतदारसंघावर पहिला दावा शिवसेनेचा आहे. परंतु या मतदार संघावर आता भाजपाचाही डोळा दिसून येत आहे. (Mahim Dadar Assembly Constituency)

(हेही वाचा – शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निर्णय ५० ते ६० वर्षात लागेल; Uddhav Thackeray यांचे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह)

शेलारांनी सुरक्षित मतदारसंघ शोधायला सुरुवात केली आहे का? 

भाजपाच्या या विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष अक्षता तेंडुलकर आणि भाजपाचे उपाध्यक्ष जितेंद्र राऊत यांच्या माध्यमातून भाजपाचे मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी या मतदारसंघात फिरण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून शेलार यांच्या दादर माहिम विधानसभा क्षेत्रातील भेटी-गाठी वाढू लागल्या आहेत. शेलार हे मागील काही दिवसांपासून या मतदारसंघातील पक्षातील पदाधिकाऱ्यांना वॉर्ड प्रवास योजनेतंर्गत भेटू लागले आहेत. विविध सेलच्या अध्यक्षांच्या घरी भेटी देत आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १९१ मध्ये जास्त मेहनत घेताना दिसत आहे. (Mahim Dadar Assembly Constituency)

प्रभाग क्रमांक १९१ हा भाजपा आणि संघासाठी अनुकूल मतदारसंघ असून १९० हा मतदारसंघ भाजपाचा आहे. तर प्रभाग १८२ आणि प्रभाग १९२ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी त्याठिकाणी भाजपाचे प्राबल्य वाढत आहे, तसेच प्रभाग क्रमांक १९४चा काही भागही भाजपाला अनुकूल असल्याने शेलार यांना या मतदारसंघात निवडणूक लढण्याची तीव्र इच्छा असल्याचे बोलले जात आहे. एक दशकापूर्वी शेलार यांनी माहिम दादर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रकट केली होती. परंतु त्यानंतरही त्यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवून ते विजयी झाले होते. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम मतदारसंघात आवश्यक तेवढे मताधिक्य मिळवता आले नाही. त्यामुळे वांद्रे पश्चिम हा मतदारसंघ म्हणावा तेवढा सुरक्षित नसल्याने शेलार (Ashish Shelar) यांनी आपल्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधायला सुरुवात केली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येणर असला तरी त्यावर शेलार यांच्याकडून हा मतदारसंघ भाजपाला सोडला जावा यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे. (Mahim Dadar Assembly Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.