मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात माहीम भागात अनधिकृत बांधकाम झाल्याचे म्हटले होते. तसेच एक महिन्यात बांधकाम हटवले नाहीतर त्याठिकाणी गणपती मंदिर बांधू असा इशाराही त्यांनी दिला होता. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून पालिकेकडून हे बांधकाम पाडण्यास सुरूवात झाली आहे.
( हेही वाचा : अफझल खानाची कबर जमीनदोस्त! राज ठाकरेंनी शिंदे – फडणवीस सरकारचे केले अभिनंदन )
पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई
माहीम दर्गा बांधकाम प्रकरणी महानगरपालिकेची मदत घेऊन हे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यावर पोलीस बंदोबस्तामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. माहीम दर्गाच्या मागे काही वर्षांपासून समुद्रात नवीन हाजीअली तयार करण्याचे काम सुरू होते असा आरोप राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत केला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माहीम समुद्रातील अनधिकृत मजारीबाबत प्रशासनाला इशारा दिला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने तोडक कारवाईसाठी महानगरपालिकेची मदत घेतली आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याने कारवाईवेळीची कोणतीही दृष्य दाखवण्यात आलेली नाहीत. आता माहीम समुद्र किनाऱ्यावरील पोलीस बंदोबस्तामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून हे बांधकाम पाडण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community