Muslim : छत्रपती संभाजी नगरातून अटक केलेला महमंद झोएब खान करणार होता हिंदुत्ववादी नेत्यांवर हल्ले

196
Crime : घुसखोर बांगलादेशी महिलांसह ५ जणांना अटक; २५ वर्षांपासून होते बेकायदेशीर वास्तव्यास

छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आलेला संशयित महमंद झोएब खान (Muslim) याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. महमंद झोएब खान यांच्या माध्यमातून अनेक हिंदुत्ववादी तसेच भाजप नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. तसेच भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यालयावर देखील हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे. महमंद झोएब खानकडून झालेल्या खुलासामुळे राज्यातील यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

आयसीसचा खलिफा याच्या नावाने शपथ घेत दहशतवादी कारवाया करण्यासाठी झोएब खान (Muslim)  हा तरुणांना भडकावत होता. तपास यंत्रणेला मिळालेल्या माहितीनंतर तपास यंत्रणेने झोएब खानच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरावर छापा टाकून त्याला अटक केली होती. यावेळी अनेक संवेदनशील दस्तऐवज जप्त करण्यात आले होते. या माध्यमातून झोएब खान याची कसून चौकशी सुरू आहे.

(हेही वाचा पुणे पोलिसांची Drugs विरोधात सलग ४थ्या दिवशी कारवाई; बुधवारी १२०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त)

महमंद झोएब खान (Muslim) आयटी इंजिनिअर आहे. तो बंगळुरूमध्ये नोकरीस असून वर्क फ्रॉम होम करत असल्याने घरून नेटवर्क चालवायचा. आयसिस दहशतवादी संघटनेविरुद्ध एनआयएने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच संभाजीनगरात ९ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. या वेळी अनेक संवेदनशील दस्तऐवज, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.