भाजपा नेते आणि गोड्डा, झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी मंगळवार, 19 मार्च रोजीच्या रात्री महुआ मोईत्रांबद्दल पोस्ट केली. त्यात त्यांनी मोईत्रा (Mahua Moitra) यांची सीबीआय तपासणी होणार आहे, त्यासंबंधिचे पत्र त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे.
(हेही वाचा Ballot Paper : लोकसभेत प्रत्येक मतदारसंघात 400 उमेदवार उभे करण्याचा मनसुबा; मतपत्रिकांवर होणार निवडणूक?)
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी मे महिन्यात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने 11 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत ही माहिती दिली होती. कॅश फॉर क्वेरी प्रकरणात 8 डिसेंबर रोजी टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांनी खासदारकीचा दर्जा गमावला. महुआने (Mahua Moitra) बेदखल करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी 3 जानेवारी रोजी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठात सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयाने लोकसभा सचिवालयाकडून उत्तर मागितले होते. लोकसभेचे सरचिटणीस यांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोणत्याही संस्थेच्या अंतर्गत शिस्तीच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू नये, असे आवाहन न्यायालयाला केले होते.
Join Our WhatsApp Community