तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी बऱ्यापैकी वाढणार असं दिसतंय. कारण त्यांच्या वकिलांनी अचानक खटला सुरु असताना माघार घेतली. या प्रकाराचे न्यायाधीशांनाही आश्चर्य वाटले. मोईत्रा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात खासदार निशिकांत दुबे आणि वकील जय अनंत देहादराय यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावर न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी शुक्रवारी सुनावणी केली. मात्र सुनावणी दरम्यान महुआचे वकील शंकरनारायणन यांनी या खटल्यातून माघार घेतली. (Mahua Moitra Case)
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ‘कॅश-फॉर-क्वेरी’ अर्थात लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी हिरानंदानी या उद्योगपतींकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी महुआ मोईत्रा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. खटल्यातून आता महुआ मोईत्रा यांच्या वकिलाने माघार घेतली आहे. हितसंबंधांच्या संघर्षाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मोईत्रा यांच्या वकिलाने खटल्यातून माघार घेतली. (Mahua Moitra Case)
(हेही वाचा – Mission Gaganyaan : पहिली वाहन चाचणी, यावेळी होणार विकासयानाचे प्रक्षेपण)
सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहादराई आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यात मागील काही काळापासून वैयक्तिक कारणातून संघर्ष सुरू आहे. वकील देहादराई हे मोइत्रा यांचे विभक्त साथीदार असल्याचे मानले जाते. मोईत्रा आणि देहादराई यांच्यात त्यांच्या पाळीव कुत्र्यावरून वाद सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत मोईत्रा यांनी देहादराई यांच्याविरुद्ध कथित घुसखोरी, चोरी, असभ्य संदेश पाठवणे आणि गैरवर्तन करणे अशा विविध कलमाअंतर्गत पोलीस तक्रारी दाखल केल्या आहेत, याबाबतचं तृणमूलच्या सूत्रांकडून कळतंय. (Mahua Moitra Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community