स्टँड अप कोमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने मुख्य प्रवाहातील माध्यमांना गिधाडांची उपमा देत माध्यमे बंद करावीत, तर देशाचे भले होईल, असे मत समाजमाध्यमावर व्यक्त केले. तर लोकांनी कामरा (Kunal Kamra)यांनाच तोंड बंद करून पूर्ण मानवतेवर उपकार करा, अशी विनंती केली.
प्रवाहातील माध्यमे म्हणजे गिधाडे
कामरा (Kunal Kamra) यांनी चार दिवसांपूर्वी ‘X’ या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ज्या लोकांना माझी प्रतिक्रिया हवी आहे, त्यांच्यासाठी – “सध्या मुख्य प्रवाहातील माध्यमे ही सत्ताधारी पक्षाची चुकीची माहिती देणारी एक शाखा म्हणून काम करीत आहे. ही अशी गिधाडे आहेत जे या देशातील जनतेसाठी महत्त्वाचे नाहीत अशा मुद्द्यांचे वृत्तांकन करतात. जर त्यांनी उद्यापासून त्यांचे दुकान कायमचे बंद ठेवले तर ते देशाचे, त्याच्या लोकांचे आणि त्यांच्या स्वतःच्या मुलांचे भले होईल.”
(हेही वाचा Mhada मुंबईसह राज्यभर १९,४९७ घरे बांधणार; किती कोटींची केली तरतूद?)
अण्णा हजारे बन रहा है
तर एकाने कामरा (Kunal Kamra) यांना उद्देशून, “तुम्ही तुमचे दुकान आणि तोंड बंद ठेवले तर ते खूप सगळ्यांसाठी चांगले होईल… संपूर्ण मानवतेवर उपकार ठरेल!” अशी खोचक प्रतिक्रिया टाकली आहे. तर दुसऱ्याने चूप “बे डल्ले.. दो कौडी का दलाल है और अण्णा हजारे बन रहा है,” अशा शब्दांत कामरा यांना सुनावले.
चौकशीसाठी समन्स
कुणाल कामराने (Kunal Kamra) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्यामुळे वाद सुरू झाला आहे. याप्रकरणी कामरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवेसनेच्या (शिंदे) नेत्यांकडून कामराना अटक करण्याची मागणी केली जात आहे. सध्या कामरा तमिळनाडूमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. तर मद्रास उच्च न्यायालयाने २८ मार्च अंतरिम अटकपूर्व जामीनाचा अर्ज मंजूर केला आहे. पाठोपाठ मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामरा (Kunal Kamra) यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे.
Join Our WhatsApp Community