स्वित्झर्लंडने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देशभरात बुरखा आणि हिजाब घालण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. आता कोणतीही महिला सार्वजनिक ठिकाणी बुरखा, हिजाब किंवा इतर कोणत्याही प्रकारे आपला चेहरा पूर्णपणे झाकू शकणार नाही. जर कोणी मुसलमान कायद्याचे उल्लंघन करताना आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. याआधी काही युरोपियन देशनी (Europe Countries) हा निर्णय घेतला आहे.
२०२१ मध्येच स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावरील बंदीबाबत मतदान झाले होते, त्यानंतर जनमत चाचणीत ५१.२१ टक्के नागरिकांनी बुरख्यावर बंदी घालण्याच्या बाजूने मतदान केले. यानंतर, २०२२ मध्ये स्वित्झर्लंडच्या संसदेत एक कायदा करण्यात आला, जो आजपासून म्हणजेच १ जानेवारी २०२५ पासून लागू होत आहे.\
अनेक देशांनी आधीच घातली बंदी
स्वित्झर्लंडपूर्वी फ्रान्स, बेल्जियम, डेन्मार्क, नेदरलँड्स, बल्गेरिया आणि ऑस्ट्रियामध्ये बुरख्यावर बंदी घालण्याचे कायदे करण्यात आले आहेत. या देशांमध्ये कायदा झाल्यानंतर, महिला सार्वजनिक वाहतूक, रेस्टॉरंट्स, सार्वजनिक कार्यालये, दुकाने आणि इतर ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी पूर्णपणे चेहरा झाकत नाहीत. (Europe Countries)
५ टक्के मुस्लिम लोकसंख्या
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की, स्वित्झर्लंडमध्ये क्वचितच महिला बुरखा घालतात किंवा चेहरा झाकतात. त्याच वेळी, लुसर्न विद्यापीठाच्या २०२१ च्या संशोधनात असे म्हटले आहे की येथे फक्त ३० महिला बुरखा घालतात. स्वित्झर्लंडच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ५ टक्के लोक मुस्लिम आहेत.
Join Our WhatsApp Community