Mumbai Goa Highway वरील पुलाला मोठे भगदाड; एका बाजूची वाहतूक बंद

591

कोकण आणि मुंबईला जोडणारी लाईफलाईन असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या ( Mumbai Goa Highway) दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. खेड भरणे येथील नवीन पुलाला मोठा तडा गेल्याने एका बाजूची वाहतूक बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. ऐन पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेबाबतच मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील ( Mumbai Goa Highway) भरणे नाका येथील जगबुडी नदीवरील मोठ्या पुलाला मोठा तडा गेल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला आहे. खेड भरणे पूल धोकादायक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे गोवा येथून मुंबईकडे जाणारी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे बोलले जात आहे. तर परशुराम घाट दरड कोसळली आहे. चिपळूण बहादुरशेख नाक्यावरचा पूल कोसळला आहे.

(हेही वाचा बांगलादेशात हिंसाचार; Mamata Banerjee यांनी बांगलादेशी नागरिकांना पश्चिम बंगालमध्ये येऊन राहण्याचे दिले आवताण)

गगनबावडा कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. असळज ते साळवण दरम्यान खोकुर्ले येथे पाणी आलेले आहे. गगनबावडा ते कोल्हापूर रस्ता पाणी आल्याने बंद झाला आहे. तरी या मार्गावरील सर्व गाड्या फोंडा मार्गे पाठवण्यात आल्या आहेत. तर सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २ मध्यम प्रकल्प असलेलं कोर्ले-सातंडी धरणं आणि १२ लघु प्रकल्प असलेली शिवडाव, आंबोली, हातेरी, माडखोल, सनमटेंब, हरकुळ, ओझरम, निळेली, पावशी, पुळास, लोरे, शिरवळ ही धरण १०० टक्के भरून ओसंडून वाहत आहेत. यामुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

सध्या ११६ कुटुंबांपैकी ४४६ नागरिकांना नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन शेतकऱ्यांचा वाहून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १४ दुधाळ जनावरे वाहून गेली. तर ३१९५ कोंबड्याचा पुरात मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गात १७ घराचं नुकसान झालं आहे. तर सार्वजनिक मालमत्तेचे ५ लाखांचे नुकसान झाले आहे. ( Mumbai Goa Highway)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.