…म्हणून सुरू झाला ‘दलाल गांधी परिवार’ ट्विटरवर ट्रेंड

राफेल घोटाळ्यासंबंधी मीडियापार्टने प्रकाशित केलेल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, भारतात यूपीए सरकार प्रभारी असताना कराराच्या वाटाघाटीदरम्यान मध्यस्थांना कमिशनच्या रुपात लाखो युरो देण्यात आले होते. या अहवालात सुरेश गुप्ता यांचे नाव आहे. सुरेश गुप्ता यांची मॅारिशस आधारित कंपनी इंटरस्टेलर टेक्नॅालॅाजीज या कराराची वाटाघाटी सुरु असताना 2007 ते 2012 या काळात कथितपणे पैसे दिले गेले होते. म्हणून सध्या ट्विटरवर ‘दलाल गांधी परिवार’ हा ट्रेंड चांगलाच गाजताना दिसतोय. 2007 आणि 2012 या काळात यूपीए सरकारचं राज्य असल्याने नेटक-यांनी आता गांधी परिवाराला चांगलेच धारेवर धरले आहे. ट्विटरवर दलाल गांधी परिवार असा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. त्यातील हे आहेत काही मजेशीर मीम्स

करन मिस्त्री या नेटक-याने मोतीलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी तसेच राहूल गांधी यांचा एक फोटो शेअर करत त्यांनी यांना तात्काळ अटक करा असं म्हटलं आहे.

फॅमिली में फॅमिली दलाल फॅमिली असं म्हणत कुमार नावाच्या एका नेटक-याने सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचा एक मीम शेअर केला आहे.

पवन वर्मा नावाच्या नेटक-याने, सत्य हे नेहमी कटू असतं असं म्हणत राहूल गांधी आणि रॅाबर्ट वाड्रा यांचा फोटो शेअर करत जीजा-साला चोर असल्याचं म्हटलं आहे.

प्रदीप कुमार या नेटक-याने मी या ट्रेंडला सपोर्ट करत असल्याचं म्हटलं आहे. त्यात त्याने गांधी परिवाराने केलेल्या घोटाळ्यांची नावं दिली आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here