मंत्री अनिल परबांच्या विश्वासूंनाही बसावे लागणार घरी

161

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांचे वर्चस्व असलेल्या वांद्रे-वाकोल्याच्या भागात आता महिलांचे राज्य चालणार आहे. वांद्रे ते सांताक्रूझ पूर्व भागात केवळ चार नगरसेविका होत्या, परंतु आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या सोडतीत या भागात आणखी तीन महिलांचे राखीव प्रभाग करण्यात आल्याने याठिकाणी महिला राज पहायला मिळणार आहे.

महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीत माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सदा परब, चंद्रशेखर वायंगणकर, हाजी हलिम खान या चार नगरसेवकांचे प्रभाग महिला राखीव झाले आहेत.तर दिनेश कुबल, प्रज्ञा भूतकर यांचे प्रभाग खुले झाले आहेत. काँग्रेसचे नगरसेवक रफिक अहमद यांचाही प्रभाग खुला झाला असून, गुलनाथ कुरेशी यांचाही प्रभाग खुला झाला आहे.

(हेही वाचाः आशिष चेंबूरकर, गंगाधरे, बब्बू खान, सुषम सावंत यांना अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा फटका)

परबांच्या विश्वासूंना धक्का

विश्वनाथ महाडेश्वर, सदा परब आणि चंद्रशेखर वायंगणकर हे परिवहन मंत्री आणि विभागप्रमुख अनिल परब यांचे विश्वासू सहकारी असून, त्यांचाही घात महिला आरक्षणाने केला आहे. दिनेश कुबल यांचा वॉर्ड खुला झाल्याने शाबूत राहिला असून, प्रज्ञा भूतकर यांचाही वॉर्ड खुला झाल्याने पुन्हा एकदा दिपक भूतकर यांची दावेदारी समजली जात आहे. त्यामुळे शिवसेनेला महाडेश्वर, सदा परब,वायंगणकर आणि हालिम खान यांच्या प्रभागात आता महिलेला संधी द्यावी लागणार आहे. महाडेश्वर यांची पत्नी पूजा महाडेश्वर माजी नगरसेविका राहिल्याने त्यांना संधी मिळू शकेल. परंतु सदा परब, वायंगणकर आणि हालिम शेख यांच्या प्रभागात जर त्यांच्या नातेवाईकांची निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्यास पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

(हेही वाचाः महापालिका आरक्षण सोडत : महिलांसाठी आरक्षित प्रभाग जाहीर)

भूषवली होती ही पदे

विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर पदाचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर स्थायी समिती सदस्यपद भूषवले होते. तर सदा परब यांनी सलग तीन वर्षे सुधार समिती अध्यक्षपद भूषवले असून, वायंगणकर हेही अनेक वर्षांपासून स्थायी समिती सदस्य होते.

(हेही वाचाः अनुसूचित जातीचे प्रभाग बनले अनूसूचित जमाती)

वांद्रे-सांताक्रूझ पश्चिमेतही महिला

वांद्रे ते खार पूर्व भागात सध्या चार महिला तर दोन पुरुष नगरसेविका आहेत. परंतु या भागातही भाजप नगरसेविका अलका केरकर व अपक्ष नगरसेविका मुमताज रहेबर खान यांचे प्रभाग खुले झाले आहेत. तर उर्वरित सर्व प्रभाग आता महिला राखीव झाल्याने या भागातही महिलांचे राज दिसून येणार असून, परिणामी एच पूर्व व एच पश्चिम प्रभाग समितीत महिलांचाच कल्ला ऐकायला मिळणार आहे.

यांना फिल्डींग लावावी लागणार

या भागात शिवसेनेचे नगरसेवक संजय अगलदरे आणि काँग्रेस नगरसेवक आसिफ झकेरिया यांचे प्रभाग महिला राखीव झाले आहेत. तर भाजपच्या हेतल गाला, स्वप्ना म्हात्रे यांचे प्रभाग महिला राखीव झाले आहेत. त्यामुळे आसिफ झकेरिया यांना आता अलका केरकर किंवा मुमताज रहेबर खान यांच्या प्रभागात फिल्डींग लावावी लागणार आहे. मुमताज रहेबर खान यांचा प्रभाग खुला झाल्याने माजी नगरसेवक राजा रहेबर खान या प्रभागातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

(हेही वाचाः या नेत्यांना दिला महिलांनी दे धक्का!)

विद्यमान नगरसेवक, कंसात नवीन प्रभाग आणि नवीन आरक्षण

विश्वनाथ महाडेश्वर(९६)- सर्वसाधारण महिला

सदानंद परब(९०)- सर्वसाधारण महिला

दिनेश कुबल(९१)- सर्वसाधारण महिला

तुलिफ मिरांडा(९२)- सर्वसाधारण महिला

रफिक अहमद(९३)- सर्वसाधारण

गुलनाझ कुरेशी(९४)- सर्वसाधारण

रोहिणी कांबळे(९५)- सर्वसाधारण महिला

प्रज्ञा भूतकर(९६)- सर्वसाधारण

चंद्रशेखर वायंगणकर(९८)- सर्वसाधारण महिला

हाजी हलिम(९९)- सर्वसाधारण महिला

(हेही वाचाः Bmc election 2022 : कोणत्या प्रभागांचे काय आरक्षण पडले जाणून घ्या)

एच पश्चिम विभाग

हेतल गाला(१००)- सर्वसाधारण महिला

अलका केरकर(१०१)- सर्वसाधारण

संजय अगलदरे (१०२)- महिला

स्वप्ना म्हात्रे (१०३)- सर्वसाधारण महिला

आसिफ झकेरिया (१०४)- सर्वसाधारण महिला

खान मुमताज रहेबर(१०५)- सर्वसाधारण

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.