दहिसरमध्ये UBT Shiv Sena ला मोठा धक्का, उपनेत्या तसेच माजी नगरसेवकाने केला शिवसेनेत प्रवेश

1231
दहिसरमध्ये UBT Shiv Sena ला मोठा धक्का, उपनेत्या तसेच माजी नगरसेवकाने केला शिवसेनेत प्रवेश
दहिसरमध्ये UBT Shiv Sena ला मोठा धक्का, उपनेत्या तसेच माजी नगरसेवकाने केला शिवसेनेत प्रवेश
  • मुंबई विशेष प्रतिनिधी

उबाठा गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी (Sanjay Ghadi) आणि उबाठाच्या उपनेत्या तथा प्रवक्त्या संजना घाडी (Sanjana Ghadi) यांच्यासह दहिसरमधील (Dahisar) उपशाखाप्रमुख, गटप्रमुख तसेच शाखाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. घाडी यांच्यासह लालबागमधील माजी नगरसेवक नाना अंबोले (Nana Ambole) यांनीही शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) उपस्थित होत्या. संजय घाडी (Sanjay Ghadi) आणि संजना घाडी (Sanjana Ghadi) यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उबाठा शिवसेनेला (UBT Shiv Sena) दहिसरमध्ये मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे उबाठामधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांची संख्या ४१ वर पोहोचली आहे. दरम्यान, उबाठा उपनेत्या संजना घाडी (Sanjay Ghadi) यांची शिवसेनेच्या उपनेते आणि प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाना अंबोले (Nana Ambole) यांची वरळी आणि शिवडी विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

WhatsApp Image 2025 04 13 at 6.17.08 PM 1 scaled

(हेही वाचा – Jaliyanwala Bagh हत्याकांड; ब्रिटिश साम्राज्याच्या निर्दयी आणि क्रूरतेच्या इतिहासाची १०५ वर्षे पूर्ण)

उबाठा शिवसेनेने (UBT Shiv Sena) काही दिवसांपूर्वीच शिवसेना प्रवक्तेपदाची यादी जाहीर केली. त्यामुळे उपनेत्या संजना घाडी (Sanjana Ghadi) यांच्यावर पुन्हा प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर पक्षातील अंतर्गत वादामुळे घाडी दाम्पत्यांने अखेर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दहिसर (Dahisar) आणि मागाठाणे विधानसभेतील आतापर्यंत शितल म्हात्रे, बाळकृष्ण ब्रीद, रिध्दी भास्कर खुरसुंगे, गीता सिंघण, संध्या दोशी आदी माजी नगरसेविकांनी उबाठा शिवसेनेला (UBT Shiv Sena) सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक संजय घाडी (Sanjay Ghadi) आणि उपनेत्या व प्रवक्त्या संजना घाडी (Sanjana Ghadi) यांनी उबाठा शिवसेना (UBT Shiv Sena) सोडणार नाही असेच बोलले जात होते. परंतु, अखेर त्यांना उबाठा शिवसेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. संजना घाडी या सुषमा अंधारे यांच्या सावली म्हणून ओळखल्या जात होत्या, परंतु आता त्यांनाही अंधारेंची साथ सोडावी लागली आहे.

(हेही वाचा – Murshidabad Violence दरम्यान टीएमसी खासदार युसुफ पठाणच्या पोस्टमुळे पेटला वाद)

संजय घाडी २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वी त्यांनी मनसे पक्षाकडून निवडणूक लढवली होती. तसेच संजना घाडी यांनी उबाठा शिवसेनेवर होणाऱ्या प्रत्येक आरोपांचे खंडन करत पक्षाची बाजू समर्थपणे मांडण्याचा प्रयत्न केला होता. शिंदे यांनी केलेल्या कामाने प्रभावित होत मूळ शिवसेनेत प्रवेश केला असे माजी नगरसेवक संजय घाडी यांनी यावेळी सांगितले. घाडी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उबाठा शिवसेनेमध्ये तेजस्वी घोसाळकर, सुजाता पाटेकर, हर्षद कारकर हे तिनच माजी नगरसेवक शिल्लक राहिले आहे.याप्रसंगी बोलतांना शिवसेनेचे मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईत १५ ते २० वर्षांपूर्वी जी कामे व्हायला हवी होती ती आपण मागील अडीच वर्षात सुरु केली. मुंबईत अटल सेतु, कोस्टल रोड झाला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची विमा सुरक्षा १.५ लाखांवरुन ५ लाख केली. हे काम करणारे सरकार आहे. ही काम करणारी शिवसेना आहे. धनुष्यबाण ही आपली निशाणी आहे. धनुष्यबाण आणि भगवा झेंडा हे आपले इमान आहे, श्वास आहे आणि आपला अभिमान आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या निवडणुकीत ८० जागा लढवून ६० जागा जिंकलो तर कोणी १०० जागा लढवून २० जागा जिंकल्या, यावरुन खरी शिवसेना कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. त्यांच्या आरोपाला आरोपातून नाही तर कामातून उत्तर दिले. बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते, सत्ता जाते पण नाव जाता कामा नये, ते नाव टिकवण्याचे काम आपण केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

नाना अंबोले यांच्यावर वरळी व शिवडी विधानसभेची जबाबदारी

घाडी दाम्पत्यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर लालबागमधील माजी नगरसेवक नाना अंबोले (Nana Ambole) यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. अंबोल यांची वरळी आणि शिवडी विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. नाना अंबोले (Nana Ambole) यांनी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला होता आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अंबोले यांनी बंडखोरी करत शिवडी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर पक्षातून त्यांना काढून टाकले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.