आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रतेच्या प्रकरणी निर्णय घेऊन उबाठाच्या आमदारांना अपात्र करावे, अशी विनंती करणारी याचिका शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी केली आहे. (Bharat Gogawale)
पक्षादेश (व्हीप) न पाळणाऱ्या उबाठाच्या आमदारांविरोधात आम्ही अपत्रातेची याचिका दाखल केली होती. त्यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात केल्याचे गोगावले यांनी सांगितले. (Bharat Gogawale)
(हेही वाचा – श्याम मानव यांची चौकशी करा; मंत्री Sudhir Mungantiwar यांची मागणी)
भारत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्यामुळे खरी शिवसेना आम्हीच आहोत. उबाठा शिवसेना नाही. उबाठाच्या आमदारांनी आमच्या व्हिपचे पालन केलेले नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी अपात्रतेचा निर्णय झाला नाही तर ही याचिका निष्प्रभ ठरले. त्यामुळे निवडणुकीपूर्वी उच्च न्यायालयाने अपात्रतेवर निर्णय द्यावा अशी विनंती केल्याची माहिती गोगावले यांनी दिली. (Bharat Gogawale)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community