राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईत सात व्यापारी केंद्रांसाठी सरकारने तरतूद केली असून यातील एका व्यापारी केंद्रालगत असलेल्या चांदिवली (Chandivali) मतदारसंघासाठी वेगवेगळ्या सुविधा देण्यात याव्यात आणि त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांनी विधानसभा अधिवेशनात केली आहे.
सातपैकी एका नियोजित व्यापारी केंद्राला जोडणारा चांदिवली विभाग हा झोपडपट्टीचा विभाग आहे. या विभागातून त्या ठिकाणी ये – जा करण्यासाठी लोकांना रस्ते उपलब्ध करण्यात यावेत. आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) या परिसराला लागून असल्याने चांदिवली (Chandivali) विभागासाठी एक नियोजित आराखडा तयार करून या परिसराचा विकास करण्यात यावा, अशी मागणी आमदार लांडे यांनी केली आहे.
(हेही वाचा – Tamilnadu मध्ये पुन्हा भाषिक द्वेषाचे राजकारण; बदलले रुपयाचे चिन्ह)
लोकांना बसण्यासाठी, आपल्या मुळाबाळासाठी उपनगरामध्ये एकही चौपाटी नाहीये आणि म्हणून छोटा काश्मीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (Dr. Babasaheb Ambedkar Park) आणि त्याशेजारी असलेल्या तलावाचे सुशोभीकरण केले तर उपनगरातील नागरिकांसाठी एक चांगले पर्यटन स्थळ उपलब्ध होईल. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पर्यटक येतील. या तलावामध्ये अनेक सुविधा देण्याचे काम या ठिकाणी करण्यात यावे, अशी मागणी आमदार लांडे (Dilip Lande) यांनी विधानसभेत केली.
साकीनाका पोलीस ठाण्याला इमारत नाही. पोलिसांची वसाहत धोकादायक म्हणून तोडली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पोलिसांना त्यांच्या हक्काचे घर देण्याचा प्रयत्न केला. त्याच धर्तीवर साकीनाका विभागातील साकीनाका पोलीस ठाणे असेल, त्यांची वसाहत असेल त्याचे दुरुस्तीकाम करण्यात यावे. प्रीमियर येथे ६५० बेडचे हॉस्पिटल अर्धवट स्थितीमध्ये आहे. ते शासनाने मंजूर करून घेण्यात यावे रचनी कार्यालय हे चांदिवलीमध्ये (Chandivali) आहे. ते त्या ठिकाणी करून घेणे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यांच्या कर्मभूमीमध्ये तातडीने स्मारक उभारण्यात यावे आणि आमच्या समाजाच्या भावनांचा आदर करून त्या ठिकाणी निधी मंजूर करण्यात यावा. तशाच पद्धतीने शांत काका महाराज समाज स्मारक या मुंबई शहरात करण्यात यावे, असे आमदार लांडे (Dilip Lande) यांनी निवेदन केले आहे.
मी रिक्षाचालक आहे. रिक्षाचालकाच्या भावना आहेत. गोरगरीब रिक्षावाला हा उपनगरामध्ये प्रत्येकाला घरापर्यंत पोहोचण्याचा काम करतो. त्यावेळचे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी रिक्षाचालकाच्या भावना ऐकल्या आणि रिक्षा आणि टॅक्सीसाठी महामंडळ स्थापन केले. या महामंडळामध्ये शंभर कोटी रुपयांची तरतूद करून आम्हाला गोरगरिबांना न्याय द्यावा, अशीही मागणी आमदार लांडे (Dilip Lande) यांनी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community