मालदीवचे मंत्री मरियम शिउना आणि इतर नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या प्रत्युत्तरात भारतीय पर्यटकांनी मालदीवसाठी विमान तिकिटे आणि हॉटेल बुकिंग रद्द केल्यामुळे मालदीव सरकार टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहे. मालदीव सरकारने आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या 3 मंत्र्यांचे तात्काळ निलंबनाचे (Maldives Minister Suspend) आदेश दिले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, मंत्री मरियम शिउना, माल्शा शरीफ तसेच युवा मंत्रालयाचे उपमंत्री महझूम माजिद यांना निलंबित करण्यात आले आहे.
मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मालदीवमध्ये ७,५०० हून अधिक हॉटेल बुकिंग आणि २,३०० हून अधिक विमान तिकिटे रद्द करण्यात आली.
(हेही वाचा – 100th Akhil Bharatiya Natya Sammelan: एकमेकांना मान द्या, तर प्रेक्षक तुमचा मान राखतील-राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना सल्ला )
पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप येथे दौरा केला होता. तेथील फोटो सोशल मिडियापर व्हायरल केले होते. त्यानंतर मालदीवमधील नव्या सरकारमधील नेत्यांनी यावर वादग्रस्त विधाने केली होती. मालदीव सरकारने यावर अधिकृत भूमिका घेतली. सरकारी पक्षाचे नेते झाहिद रमीझ यांनी भारत पैसे कमवण्यासाठी श्रीलंका आणि आजूबाजूच्या लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत असल्याचं म्हटलं आहे.
दोन्ही देशांच्या मैत्रीवर नकारात्मक परिणाम…
मालदीव सरकारचे प्रवक्ते मंत्री इब्राहिम उलील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मालदीव सरकारचे प्रवक्ते इब्राहिम उलील यांनी यासंदर्भात माहिती दिली. मालदिवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद रोलिह यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मालदिव सरकारच्या मंत्र्यांकडून सोशल मिडियावर भारताविरोधात वापरण्यात आलेल्या द्वेषपूर्ण भाषेचा निषेध करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारत मालदीवचा जवळचा मित्र आहे. या प्रकारच्या आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे दोन्ही देशांच्या मैत्रीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही पहा –