Malegaon जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी दुय्यम निबंधक अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक याला अटक

50
Malegaon जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी दुय्यम निबंधक अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक याला अटक
Malegaon जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी दुय्यम निबंधक अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक याला अटक

बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा (Bangladeshi birth certificate scam) प्रकरणात आता मालेगाव महापालिकेतील (Malegaon Municipal Corporation) दुय्यम निबंधक अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक (Abdul Tawab Abdul Razzaq) (३६) यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दि. १८ मार्च रोजी या गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. तसेच अब्दुल रज्जाक (Abdul Tawab Abdul Razzaq) यांच्या निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. त्यातच मालेगावात (Malegaon) एकूण ३९७७ जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे, अशी धक्कादायक माहिती किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली. (Malegaon)

( हेही वाचा : Himadri Share Price : हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्सचा शेअर पडझडीतही कात टाकतोय का?

याप्रकरणी मालेगाव महापालिकेचे (Malegaon Municipal Corporation) आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव (Ravindra Jadhav) यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ (२) (अ) नुसार शासकीय कर्मचाऱ्याला फौजदारी आरोपाखाली किंवा अन्यथा अटक करुन ४८ तासाहून अधिक काळ पोलीस किंवा न्यायालयीन अभिरक्षेमध्ये ठेवले असेल तर, त्याला अटकेत ठेवल्याच्या दिनांकापासून निलंबनाधीन ठेवले असल्याचे मानले जाईल अशी तरतुद आहे. त्यानुसार, अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त रविंद्र जाधव यांनी पत्राद्वारे छावणी पोलीस ठाण्याला दिली.

यामुळे अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक (Abdul Tawab Abdul Razzaq) यांना निलंबन काळात कुठलीही रजा अनुज्ञेय राहणार नाही. तसेच अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक यांना मालेगाव महानगरपालिका (Malegaon Municipal Corporation) आयुक्तांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नाही. तसेच निलंबन कालावधीत अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक यांना अन्य नोकरी किंवा वैयक्तिक उद्योगधंदे करता येणार नाहीत व असे केल्याचे आढळून आल्यास ते गैरवर्तणुकीबाबत दोषी ठरतील आणि त्यानुसार कार्यवाहीस पात्र ठरतील, व त्यामुळे ते निर्वाह भत्त्यावरील आपला हक्क गमावून बसतील, असेही पत्राद्वारे दिलेल्या माहितीत लिहले आहे. (Kirit Somaiya)

त्याबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतुन काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम ६९ (४) व (६) नुसार विहीत केलेली प्रमाणपत्र प्रत्येक महिन्यात निर्वाहभत्त्याचे वाटप करण्यापुर्वी अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक (Abdul Tawab Abdul Razzaq) यांनी आस्थापना शाखेत सादर करावीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. (Malegaon Municipal Corporation)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.