Malegaon Central मतदारसंघात भाजपाची शरणागती?

133
Malegaon Central मतदारसंघात भाजपाची शरणागती?
  • सुजित महामुलकर

मालेगाव मध्य (Malegaon Central) विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या एकमेव उमेदवार सुरेखा पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यांचा अर्ज बाद होण्यामागे भाजपाचे अंतर्गत राजकारण, सुसंवादाचा अभाव की भाजपाकडून या मतदारसंघात पत्करलेली शरणागती याबाबत उलटसुलट चर्चा (Malegaon Central) मतदारसंघात होत आहे.

मुस्लिमबहुल मालेगाव मध्य

मालेगाव मध्य (Malegaon Central) हा मतदारसंघ मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर चर्चेत आला तो या ठिकाणी झालेल्या मतदानाच्या ‘एम-पॅटर्न’मुळे. लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघातून भाजपाचे सुभाष भामरे तर कॉँग्रेसकडून शोभा बच्छाव आमने-सामने होते. धुळे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी पाच ठिकाणी भामरे आघाडीवर होते तर मुस्लिमबहुल मालेगाव मध्य (Malegaon Central) या विधानसभा क्षेत्रात भामरे यांना ४,५४२ मते मिळाली तर बच्छाव यांनी १.९४ लाख मतांची आघाडी घेतली.

(हेही वाचा – Diwali साजरी करणाऱ्या तरुणीचा धर्मांधांकडून विनयभंग; हिंदू कुटुंबाच्या घरावर दगडफेक)

उमेदवारी अर्ज दाखल, ए-बी फॉर्म कुठे?

मालेगाव (Malegaon Central) भागातील मतदानानंतर भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेखा पाटील यांनी या विधानसभा क्षेत्रात जोमाने काम करण्यास सुरूवात केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना मुस्लिम भागातील महिलांपर्यंत पोहोचवल्या. या कामाची दखल घेत भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले, मात्र पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता मिळवण्यासाठीचा ए-बी फॉर्म दिला गेला नाही.

वातावरण बदलत होते

याबाबत सुरेखा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले की, “या भागात (Malegaon Central) भाजपाबाबत मुस्लिम महिलांमध्ये अनेक गैरसमज होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळाला तरी त्याचे श्रेय भाजपा पक्षाला मिळत नव्हते. मुळात मोदी सरकारच्या योजना आहेत, हे त्यांना माहीतच नव्हते. आपण जवळपास ५०० महिलांपर्यंत पोहोचलो आणि त्यांचा गट तयार करून योजनांचा लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून दिला जात असल्याचे त्यांना सांगितले. आता त्यांचा भाजपावर विश्वास बसत चालला होता आणि वातावरण बदलत होते. त्यामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश कचवे यांनी आपल्याला उमेदवारी अर्ज भरायला सांगितले तसा भरला. मात्र, ए-बी फॉर्म का नाही आला, याचे कारण कदाचित ‘कम्युनिकेशन गॅप’ असावा,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.

पाटील यांच्या ‘एक्झिट’मुळे आता (Malegaon Central) १६ उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.