मालेगाव दंगल : अटक सत्र सुरूच, नुकसानीच्या वसुलीचा प्रस्तावही तयार

73
त्रिपुरातील कथित हिंसाचाराचे भांडवल करत रझा अकादमीने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हिंसाचार घडवून आणला होता. या प्रकरणी पोलिसांनी सुरु केलेले अटकसत्र सुरूच आहे. तसेच पोलिसांनी आता या दंगलीत झालेल्या नुकसानीच्या वसुलीचाही निर्णय घेतला आहे. धर्मांध दंगलखोर मुसलमानांकडून या नुकसानीची वसुली करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

अटक झालेल्यांची संख्या ५२ 

पोलिसांनी मालेगाव हिंसाचाराची गंभीरतेने दखल घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटकसत्र सुरु केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी १० जणांना अटक केली आहे. त्यामुळे आता अटक झालेल्यांची संख्या ५२ झाली आहे. यामध्ये आजी-माजी नागरसेवकांचाही समावेश आहे. नुकतेच पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री रझा अकादमीच्या कार्यालयावरही धाड टाकली आणि त्यातून काही पत्रके आणि कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

नुकसानीची वसुली होणार 

या दंगलीत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, त्या नुकसानीची वसुली करण्याचा प्रस्तावही पोलिसांनी तयार केला असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे आता या दंगलखारांकडून ही वसुली केली जाणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत घडवलेला हिंसाचार अधिकाधिक वाढावा यासाठी सोशल मीडियातून प्रक्षोभक पोस्ट करण्यात आल्याचे महाराष्ट्र सायबर सेलच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्या पोस्ट कोणत्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे प्रसिद्ध झाल्या, याचा शोधही पोलिस घेत आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.