पंजाबात मुस्लिम बहुल म्हणून स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा! काँग्रेसकडून मुसलमानांना ईदनिमित्त भेट! 

ईदच्या निमिताने औचित्य साधून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील मलेरकोटला या मुस्लिम बहुल भागाची स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषणा केली. 

97

देशात जिथे जिथे मुसलमानांची लोकसंख्या वाढते, तिथे मुसलमान स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व दाखवतात. नंतर तो भाग मुसलमान अप्रत्यक्षपणे स्वतःची मालमत्ता समजू लागतात. थोडक्यात तिथे अन्य धर्मियांना दुसरा दर्जा दिला जातो, मग तो मुंबईतील मुंब्रा, भेंडी बाजार यांसारखे मोहल्ले असो कि काश्मीर, पश्चिम बंगाल यांसारखी राज्ये असो. त्या त्या भागातील राज्यकर्त्यांनी मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी मुसलमानांच्या अशा विघटनवादी विचारांना प्रोत्साहन दिले. काँग्रेसने याची पंजाबमध्ये पुनरावृत्ती केली. ईदच्या निमिताने औचित्य साधून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील मलेरकोटला या मुस्लिम बहुल भागाची स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषणा केली.

जिल्ह्यात मुसलमानांची ९० टक्के लोकसंख्या!  

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या नव्या जिल्ह्याच्या घोषणेमुळे पंजाबमध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या २३ झाली आहे. या जिल्ह्यात मुसलमानांची लोकसंख्या ६९ टक्के आहे, तर हिंदूंची लोकसंख्या २० टक्के आणि शिखांची लोकसंख्या फक्त ९ टक्के होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०११ च्या जनगणनेनुसार या नव्या जिल्ह्यात मुसलमानांची ८० टक्के लोकसंख्या होती, आता या जिल्ह्यात मुसलमानांची लोकसंख्या ९० टक्के झाली आहे.

(हेही वाचा : ‘या’ कारणांमुळे मुंबईत लसीकरणाचा सावळागोंधळ! )

ईदच्या निमित्ताने केली घोषणा! 

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या मुस्लिम बहुल भागाची स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषणा करण्यासाठी शुक्रवार, १४ मे रोजीच्या ईदचे निमित्त साधले. या दिवशी या नव्या जिल्ह्याची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी मुसलमानांना खूष करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे या भागाचा स्वतंत्र जिल्हा म्हणून निर्माण करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री कॅप्टन सिंग यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिले होते, त्याची पूर्तता त्यांनी ईदच्या दिवशी केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री? 

  • या भागाला स्वत्रंत्र इतिहास आहे. त्यामुळे या भागाचा नवा जिल्हा म्हणून घोषणा केली.
  • या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, महिला महाविद्यालय, बस स्टॅन्ड आणि महिलांसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्यासाठी ५०० कोटींची तरतूद.
  • जिल्हा प्रशासकीय कार्यालयाची स्थापना तातडीने करण्यात येईल.
  • जिल्ह्यातील नवे वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव शेर महंमद खान असणार आहे, जे मलेरकोटला भागाचे नवाब होते.

सोशल मीडियातून विरोध 

या प्रकरणी आता सोशल मीडियातून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना विरोध होऊ लागला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.