महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? या बद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी दावा केला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. यात महाविकास आघाडी कमीत कमी 46 जागांवर विजय मिळवेल असा दावा खर्गे यांनी केला. महिलांना दरवर्षी १ लाख रुपये देणार. शेतकऱ्यांच्याा साहित्यावर जीएसटी हटवणार. या काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Mallikarjun Kharge)
आपली चूक लक्षात येताच सॉरी
खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, काँग्रेस (Congress) सरकारने कर्नाटकमधून गॅरंटी योजना सुरु केली आहे. या योजनेसंदर्भात इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांशी चर्चा केली. त्यानंतर ऑल इंडिया पातळीवर ही गॅरंटी करण्याचा उल्लेख आम्ही जाहीरनाम्यात केला आहे. त्यानुसार, महालक्ष्मी योजनेतंर्गत एक लाख कोटी रुपये दरवर्षी घरातील प्रमुख महिलेस देण्यात येणार आहे. खर्गे यांना आपली चूक लक्षात येताच सॉरी, एक लाख रुपये…असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. (Mallikarjun Kharge)
विश्वासघाताचं राजकारण सुरु आहे
मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले, “महाराष्ट्रात महायुती सरकार बेकायद पद्धतीने बनल आहे. यात धोका, कारस्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सरकारच समर्थन करतात. पंतप्रधान मोदी कुठेही गेले, तरी ते लोकांमध्ये फूट पाडण्याच काम करतात. कदाचितच असं कुठल्या पंतप्रधानाने केलं असेल. मी ५३ वर्षांपासून राजकारणात आहे. विश्वासघाताचं राजकारण सुरु आहे. मोदी सरकार संविधानाचा दुरुपयोग करत आहे. धमकी, बॅल्कमेल, आमिष दाखवून विरोधी पक्ष फोडले जात आहेत.” असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. (Mallikarjun Kharge)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community