हुसेन दलवाईंनंतर Mallikarjun Kharge यांच्याकडून महाकुंभचा अवमान; म्हणाले, गंगेत डुबकी…

119
हुसेन दलवाईंनंतर Mallikarjun Kharge यांच्याकडून महाकुंभचा अवमान; म्हणाले, गंगेत डुबकी...
हुसेन दलवाईंनंतर Mallikarjun Kharge यांच्याकडून महाकुंभचा अवमान; म्हणाले, गंगेत डुबकी...

प्रयागराज (Prayagraj) येथे होत असलेल्या महाकुंभ २०२५ मध्ये गंगेत स्नान करणाऱ्या भाजपा नेत्यांवर काँग्रेस अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी जोरदार टीका केली. खरगे हे मध्य प्रदेशमधील महू येथे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान रॅली’मध्ये बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रयागराज येथे गंगेत स्नान केल्याच्या पार्श्वभूमीवर खरगेंनी ही टीका केली आहे. त्याआधी हुसैन दलवाई (Husain Dalwai) यांनीही महाकुंभ मेळ्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, महाकुंभमेळ्यामुळे प्रयागराजमध्ये अस्वच्छता होईल. यामुळे संसर्ग आजार पसरेल, असेही ते दलवाई (Husain Dalwai) म्हणाले होते.

( हेही वाचा : Electricity Bill : यंदा वीज बिल कमी होणार? महावितरणचा दर कपातीचा प्रस्ताव 

खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, अरे भाई, गंगेत डुबकी घेतल्याने गरिबी दूर होते का? तुम्हाला पोटासाठी अन्न मिळतं का?. पण क्षणार्धात आपली चूक लक्षात येताच खरगेंनी माफी मागितली. ते पुढे म्हणाले, ला कोणाच्याही धार्मिक भावना दुखावायच्या नाहीत. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. पण मला सांगा एखादा मुलगा उपाशी मरत असेल, तो शाळेत जाऊ शकत नसेल, मजुरांना मजूरी मिळत नसेल… अशा परिस्थितीत ते हजारो रुपये खर्च करत आहेत आणि चढाओढीने डुबक्या घेत आहेत”, असे खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले.

तसेच भाजपा (BJP) नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले की, जोपर्यंत टीव्हीवर व्यवस्थित दिसत नाहीत तोपर्यंत ते डुबकी घेत राहतात. मोदी-शाह यांनी एकत्र इतकी पापं केली आहेत की ते पुढील १०० जन्म घेतले तरी ते स्वर्गात जाणार नाहीत. लोकांच्या शापांमुळे ते नरकात जातील, असे वादग्रस्त विधान खरगेंनी (Mallikarjun Kharge) केले. त्यांच्या या विधानाविरोधात अनेकांनी टीकास्त्र उगारले.

भाजपा नेते संबीत पात्रा म्हणाले की, महाकुंभ कोट्यवधी वर्षांपासून सनातन आस्थेचं प्रतिक आहे. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे अध्यक्ष त्याची टिंगल करत आहेत. महाकुंभ स्नान याबद्दल मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी केलेलं विधान अत्यंत लज्जास्पद आहे. इफ्तार पार्टी आणि हज यात्रेबद्दलही काँग्रेस पक्ष असं लाजिरवाणं विधान करू शकते का?, असा सवालही पात्रा यांनी यावेळी काँग्रेस (Congress) पक्षासह खरगेंना (Mallikarjun Kharge) विचारला.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.