Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या विधानसभेत अपराजिता महिला-बाल सुरक्षा विधेयक सादर!

92
Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या विधानसभेत अपराजिता महिला-बाल सुरक्षा विधेयक सादर!
Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या विधानसभेत अपराजिता महिला-बाल सुरक्षा विधेयक सादर!

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये 8 ऑगस्टच्या रात्री एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार (Kolkata Doctor Rape Case) करून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी जोर धरुन होती. या प्रकरणानंतर राज्यसरकारही अलर्ट मोडवर आले असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बलात्कारविरोधी विधेयक आणण्याची घोषणा केली आहे.

हे विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले. या विधेयकाचे नाव ‘अपराजिता महिला आणि बाल विधेयक 2024’ (Aparajita Women and Children Bill 2024) आहे. या विधेयकात महिला आणि बालकांविरोधातील गुन्ह्यांबाबत अनेक कठोर नियम करण्यात आले आहेत. राज्यातील महिला आणि बालकांवरील गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात आले आहे.(Mamata Banerjee)

काय आहे या विधेयकात?

– बलात्कार आणि खून प्रकरणात फाशीची तरतूद

– या विधेयकांतर्गत आरोपपत्र दाखल केल्यानंतर ३६ दिवसांच्या आत मृत्युदंडाची तरतूद आहे.

– केवळ बलात्कारच नाही तर ॲसिड हल्ला हा देखील तितकाच गंभीर गुन्हा आहे, ज्यासाठी या विधेयकात जन्मठेपेची तरतूद आहे.
प्रत्येक जिल्ह्यात स्पेशल फोर्स-अपराजिता टास्क फोर्स तयार करण्यात येईल.

– हा अपराजिता टास्क फोर्स बलात्कार, ॲसिड हल्ला किंवा विनयभंगाच्या प्रकरणात कारवाई करेल.

– या विधेयकात आणखी एक महत्त्वाची बाब जोडण्यात आली आहे, ती म्हणजे जर कोणी पीडितेची ओळख उघड केली तर त्याच्यावरही कठोर कारवाई केली जाईल.

– हे विधेयक राज्यात मांडण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. बलात्कार आणि महिला आणि बालकांवरील गंभीर गुन्ह्यांसाठी राज्य सरकारने अशी विधेयके आणण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी याआधीही दोन राज्यांनी अशी विधेयके आणण्याचा प्रयत्न केला आहे.

– आंध्र प्रदेशने 2019 मध्ये दिशा विधेयक आणण्याचा प्रयत्न केला होता आणि महाराष्ट्राने 2020 मध्ये शक्ती विधेयक आणण्यासाठी मोहीम सुरू केली होती, परंतु विधेयक मंजूर झाले नाही.

विधेयकांमध्ये कठोर शिक्षेचे प्रावधान केलेले असले, तरी पण ममता बॅनर्जी या विधेयकांतर्गत आरोपीवर कारवाई करतात का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.