लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची धामधूम चालू असतांनाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) ममता बॅनर्जी यांचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee Injured) घरात ट्रेडमिल वापरताना पडल्या. या वेळी त्यांच्या डोक्याला मार लागला, अशी माहिती समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसने शेअर केलेल्या फोटोत ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर जखम झाली असून त्यातून रक्त वहात आहे, असे दिसते.
(हेही वाचा – NIA : दहशतवादी कृत्यांकरता पैसे हवेत म्हणून ‘ते’ टाकायचे दरोडे)
ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर कोलकाताच्या SSKM रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीची बातमी तृणमूल काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडलवर फोटो शेअर करून दिली आहे. ‘पक्षाच्या अध्यक्षांना गंभीर दुखापत, त्यांनी बरं होण्यासाठी प्रार्थना करा’ अशी पोस्ट या फोटोसोबत करण्यात आली आहे.
Our chairperson @MamataOfficial sustained a major injury.
Please keep her in your prayers 🙏🏻 pic.twitter.com/gqLqWm1HwE— All India Trinamool Congress (@AITCofficial) March 14, 2024
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचाराची धामधूम चालू असतांनाही ममता बॅनर्जींच्या पायाला दुखापत झाली होती. त्या वेळी त्यांनी दुखापतग्रस्त पाय घेऊन केलेल्या प्रचारामुळे त्यांच्याविषयी सहानुभूतीचे वातावरण निर्माण झाले होते. आताही बरोबर लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतांना त्यांच्या डोक्याला जखम झाल्याने त्यांची जखम खरी आहे कि पुन्हा केलेली ही खेळी आहे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. (Mamata Banerjee)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community