Mamata Banerjee यांनी बलात्कारित पीडितांसाठी बनवले रेट कार्ड; बंगालमधील पीडित डॉक्टरच्या वकिलाचा गंभीर आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अत्यंत निंदनीय आहे. जेव्हा केव्हा बलात्कार होतो, तेव्हा त्यांना लगेचच पीडितेच्या कुटुंबीयांसोबत बोलायचे असते, त्या त्यांना पैसे देतात आणि संर्व संपले आहे असे सांगतात.

135

कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवरील बलात्कार आणि खुनाचे प्रकरण अधिकाधिक तापत चालले आहे. या प्रकरणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) अडचणीत सापडल्या आहेत. आता तर ममता बॅनर्जी यांच्यावर पीडित डॉक्टरच्या वकिलाने गंभीर आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांनी पीडितांसाठी चक्क रेट कार्ड बनवेल असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांना पैसे देतात 

या आरोपामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. एनआयए या वाहिनीशी बोलताना वकील विकास रंजन भट्टाचार्य म्हणाले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अत्यंत निंदनीय आहे. जेव्हा केव्हा बलात्कार होतो, तेव्हा त्यांना लगेचच पीडितेच्या कुटुंबीयांसोबत बोलायचे असते, त्या त्यांना पैसे देतात आणि सर्व संपले आहे असे सांगतात. दुर्दैवाने त्यांनी बलात्कार पीडितांसाठी रेट कार्ड निश्चित केले आहे… त्या साक्षीदार विकत घेण्याचा प्रयत्न करतात. तत्पूर्वी, पीडितेच्या पालकांनीही तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) ‘डबल स्टँडर्ड’ असल्याचा आरोप केला होता. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

(हेही वाचा Rahul Gandhi यांना होणार का २ वर्षांचा तुरुंगवास ? पुणे सत्र न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष)

पीडितेच्या वडिलांनीही केले गंभीर आरोप

पीडितेचे वडील रविवारी म्हणाले, ‘मुख्यमंत्री मोठ मोठ्या गप्पा मारत आहेत, माझ्या मुलीसाठी न्याय मागत रस्त्यांवरून चालत आहेत. याच वेळी त्या, जनतेचा रोष कमी करण्याचाही प्रयत्न करतात. त्या अशा दुटप्पी कामात का सहभागी आहे? त्यांना लोकांची भीती वाटत आहे का? आमच्याकडे काही प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे आवश्यक आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस सोमवारी म्हणाले, बंगाल हे महिलांसाठी सुरक्षित ठिकाण नाही. बंगालने महिलांना निराश केले आहे. समाजाने नाही, तर विद्यमान सरकारने महिलांना निराश केले आहे. बंगालने आपला गौरव पुन्हा एकदा मिळवायला हवा. जेथे महिलांचा सन्मान होईल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.