Mamata Banerjee : ‘हिंदुस्थान पोस्ट’ची बातमी खरी ठरली; इंडि आघाडीमध्ये सर्वांत मोठी फूट

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींचे एकला चलो रे; कॉंग्रेसवर केले गंभीर आरोप

397
Mamata Banerjee : 'हिंदुस्थान पोस्ट'ची बातमी खरी ठरली; इंडि आघाडीमध्ये सर्वांत मोठी फूट
Mamata Banerjee : 'हिंदुस्थान पोस्ट'ची बातमी खरी ठरली; इंडि आघाडीमध्ये सर्वांत मोठी फूट

लोकसभेसाठी विरोधकांनी तयार केलेल्या इंडि आघाडी मध्ये मोठी फूट पडली आहे. पश्चिम बंगालमधील 42 लोकसभेच्या जागा तृणमूल काँग्रेस एकट्याने लढणार असल्याचे तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज स्पष्ट केले आहे. या घोषणेमुळे विरोधकांच्या इंडि आघाडीला मोठा फटका बसणार असल्याचे वृत्त आधीपासूनच ‘हिंदुस्थान पोस्ट’ने दिले होते.

(हेही वाचा – Lexus LM 2024 : लेक्ससची नवीन हायब्रीड एसयुव्ही बाजारात, किंमत ऐकून व्हाल थक्क)

विरोधकांची इंडि आघाडी (india alliance) तयार झाल्यापासूनच आपसात एक मत होत नसल्याने यामध्ये मोठी फूट पडू शकते, अशा प्रकारच्या बातम्या वेळोवेळी समोर येतच होत्या. त्यातच आज ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आघाडीला मोठा सुरुंग लावला असून हा पहिलाच सुरुंग असल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या यात्रेबद्दल आपल्याला विश्वासात न घेतल्यामुळे देखील ममता बॅनर्जी नाराज असल्याचं बोलून दाखवलं. पश्चिम बंगालमधील 42 च्या 42 जागा तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) एकट्याच्या जीवावर लढणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – Rohit Pawar ED Raid : ईडी ही भाजपची शाखा; रोहित पवार यांच्या चौकशीच्या प्रकरणी संजय राऊत यांचे आरोप)

इंडि आघाडीतील ममता बॅनर्जी या सर्वात महत्त्वाच्या नेत्या मानल्या जात होत्या. त्यातच लोकसभेला कोणत्याही राजकीय पक्षाशी युती किंवा आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने आघाडीला याचा मोठा फटका बसू शकतो. अशाच प्रकारचा मोठा धक्का आम आदमी पार्टीकडून (Aam Aadmi Party) देखील येणाऱ्या काळात मिळू शकतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.