सनातन हिंदू धर्माबद्दल Mamata Banerjee यांचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या, ‘एक घाणेरडा धर्म…’

'राम आणि बाम' एकत्र आले आहेत. लाल आणि भगवे आता एकत्र आले आहेत आणि राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

96

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ३१ मार्च, सोमवार रोजी कोलकाता येथे ईदच्या नमाजला हजेरी लावली. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या की, पश्चिम बंगालमधील विरोधी पक्ष, “राम आणि बाम” (भाजप आणि डावे पक्ष), दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी भाजपावर जातीय दंगली भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला. भाजपाचा ‘घाणेरडा हिंदू धर्म’ हा हिंदुत्वाच्या खऱ्या तत्त्वांच्या विरोधात आहे, असेही बॅनर्जी म्हणाले.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाले की, सरकार राज्यातील जनतेसोबत उभे राहील आणि कोणीही राज्यात तणाव निर्माण करू शकणार नाही याची खात्री करेल. ‘राम आणि बाम’ एकत्र आले आहेत. लाल आणि भगवे आता एकत्र आले आहेत आणि राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. ते दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण तुम्ही लोकांनी प्रतिक्रिया देऊ नये. त्यांच्या जाळ्यात अडकू नका.
मुख्यमंत्री ममता (Mamata Banerjee) म्हणाल्या, “मी श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांनी स्वीकारलेल्या हिंदू धर्माचे पालन करते. मी भाजपच्या घाणेरड्या हिंदू धर्माचे पालन करत नाही, असे म्हणत भाजपा  सरकारला ‘जुमलाबाज सरकार’ असेही म्हटले. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी पक्षाने केलेल्या कामावर प्रकाश टाकला. गेल्या (२०२४) लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्रितपणे भाजपाला रोखले होते. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर बोलताना त्या म्हणाल्या, चंद्राला कोणताही धर्म नसतो. भारत हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि प्रत्येक व्यक्तीसाठी समान आहे.”

ईदच्या निमित्ताने भडकाऊ भाषण

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, “तुम्ही कोणत्या धर्माला घाणेरडे म्हणत आहात? हा सनातन धर्म आहे का? ईदच्या निमित्ताने तुम्ही असे भडकाऊ भाषण का दिले? ते धार्मिक कार्यक्रम होते की राजकीय? तुम्ही घाणेरडे भाषण देण्याचा प्रयत्न करत आहात का?”
भाजप नेते अमित मालवीय यांनीही अशाच प्रकारे म्हटले आहे की, “ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी सनातन धर्म हा घाणेरडा धर्म आहे का? त्यांच्या राजवटीत अनेक हिंदूविरोधी दंगली होऊनही, त्या हिंदूंची आणि त्यांच्या श्रद्धेची थट्टा करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ईद साजरी करण्यासाठी उभारलेल्या व्यासपीठावरून वादग्रस्त विधान केले आहे.”

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.