गड आला, पण वाघीण हरली

देशाचं लक्ष लागलेल्या महत्वाच्या लढतीत ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममधून मतदारसंघातून भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केला आहे. भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी १ हजार ६२२ मतांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला, असं ट्वीट भाजपा नेते अमित मालवीय यांनी केलं आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा नैतिक हक्क नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकीकडे ममता बॅनर्जी यांनी जरी पश्चिम बंगाल राखले असले, तरी त्यांचा पराभव झाला आहे.

दिदी न्यायालयात जाणार

मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून या विरोधात मी न्यायालयात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचा पराभव झाला आहे. त्यांनी घाणेरडे राजकारण केले. आम्ही निवडणूक आयोगाकडून खूप त्रास सहन केला, असे त्या म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here