राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमधील उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालकमंत्री आपल्या दारी अशाप्रकारची मोहिम राबवून प्रत्येक विभागांमध्ये महापालिकेच्या कामांचा आढावा घेतला जातो. पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये भाजपसह सर्वच पक्षांचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. परंतु यापूर्वीच्या उपनगराच्या पालकमंत्र्यांनी केवळ आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली होती. त्यामुळे जिथे आधीच्या उपनगराच्या पालकमंत्र्यांनी आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, तिथे विद्यमान पालकमंत्री हे आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधी, नगरसेवकांसह इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधीनाही त्यांनी या बैठकीत सामावून घेतल्याने यापूर्वीच्या आदित्य ठाकरेंच्या तुलनेत लोढा हेच उपनगराचे सरस पालक मंत्री असल्याचे दिसून येत आहे.
“पालकमंत्री आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दोन दिवसांपूर्वी भांडुप येथे ‘एस’ विभाग कार्यालयास भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या व त्याचे निराकरण केले, याप्रसंगी भाजप खासदार मनोज कोटक, शिवसेना आमदार रमेश कोरगावकर, भाजपच्या माजी नगरसेविका जागृती पाटील, सारिका पवार, साक्षी दळवी, वैशाली पाटील, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक राय, भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले, विक्रोळी विधानसभा अध्यक्ष मंगेश पवार, दीपक दळवी, शिवसेना माजी नगरसेवक उमेश माने, दीपमाला बढे, गोसावी, सुवर्णा करंजे, उपेंद्र सावंत, भाजप आणि शिवसेना पदाधिकारी, ‘एस’ विभागाचे अधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
उपनगराचे पालकमंत्री म्हणून मंगलप्रभात लोढा हे मागील काही दिवसांपासून पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील काही महापालिका प्रशासकीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये आढावा बैठक घेण्यात येत आहे. या उपक्रमांतंर्गत घेतलेल्या बैठकांमध्ये सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना सामावून घेत होते. परंतु लोढा हे ज्याप्रकारे पालकमंत्री म्हणून सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना सामावून घेत असले तरी यापूर्वीच्या पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र पालकमंत्री म्हणून शिवसेनेच्याच नगरसेवकांच्या बैठका घेत होते. आदित्य ठाकरे हे कायमच आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निवारण प्रशासनाच्या स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, आदित्य ठाकरेंच्या काळात कधीही इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना संधी दिली जात नव्हती. त्यामुळे सध्याची भाजप आणि लोढा यांची कार्यपध्दती पाहता यापूर्वीच्या आदित्य ठाकरे यांची कार्यपध्दती ही केवळ आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांना पुढे घेऊन जाण्याची होती. त्यामुळे पालकमंत्री असूनही ते केवळ पक्षाचे नेते म्हणूनच काम करत होते आणि त्यातुलनेत लोढा हे पालकमंत्री म्हणून सर्व पक्षांना सोबत घेऊन जात असल्याने आदित्य पेक्षा हे लोढा यांनी उपनगराचे सरस पालकमंत्री म्हणून ओळख निर्माण केल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community