दसरा मेळाव्यात क्रांतीकारी निर्णय का घेतला याचा भांडाफोड करा; कुडाळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

164

राज्याच्या सत्तासंघर्षाचा वाद आधीच सर्वोच्च न्यायालयात असताना, आता दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. आता यातच शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची मागणी केली आहे. तसेच, या दसरा मेळाव्यात तुम्ही क्रांतीकारी निर्णय का घेतला त्याचा भांडाफोड करा, अशी मागणीही कुडाळकर यांनी या पत्रातून केली आहे.

( हेही वाचा: कारच्या मागच्या सीटवर बसणा-यालाही आता सीटबेल्ट बंधनकारक- गडकरी )

मंगेश कुडाळकर यांचे पत्र जसेच्या तसे

हिंदूत्वाचा विचार आपण घेऊन एक क्रांतीकारी निर्णय घेतला. आता हिंदूत्वाचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे साहेबांची शिकवण आपण छत्रपती शिवाजी पार्क मैदान येथे दसरा मेळावा घेऊन ख-या अर्थाने महाराष्ट्राला दिशा द्या.. माझी आपल्याला विनंती आहे. एकनाथ शिंदे यांनी हा क्रांतीकारी निर्णय का घेतला याचा भांडाफोड आपण दसरा मेळाव्यात करावा… त्यामुळे आपण शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घ्यावा ही आमची विनंती नाही तर आग्रह आहे.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात घमासान सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटानेदेखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.