
-
प्रतिनिधी
मंगेशकर कुटुंबावर (Mangeshkar Family) काही राजकीय नेत्यांकडून हिंदुत्वनिष्ठ असल्याच्या कारणास्तव टार्गेट केले जात असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कथित गैरप्रकारांवरून मंगेशकर कुटुंबाला “लुटारूंची टोळी” संबोधत त्यांचे योगदान गायनापुरतेच मर्यादित असल्याचा दावा केला. काही विश्लेषकांचे मत आहे की, मंगेशकरांचे हिंदुत्वाशी असलेले जवळचे नाते आणि त्यांच्या सांस्कृतिक कार्यामुळे त्यांना वारंवार अशा टीकेचा सामना करावा लागतो. या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत मंगेशकर कुटुंबाचे सांस्कृतिक आणि सामाजिक योगदान सर्वश्रुत असल्याचे सांगितले.
(हेही वाचा – उबाठा पक्षाचे आमदार Sunil Raut यांच्याविरोधात गुन्हा दाखल)
मंगेशकर कुटुंबाचे (Mangeshkar Family) गोवा मुक्ती संग्रामातील योगदानही उल्लेखनीय आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. १९५४ मध्ये लता मंगेशकर यांनी संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत पुण्यात एका मैफलीद्वारे गोवा मुक्ती संग्रामातील क्रांतिकारकांसाठी निधी उभारला. या काळात गोव्यातील सशस्त्र आणि सत्याग्रही चळवळींना आर्थिक पाठबळाची गरज होती. लतादीदींच्या या योगदानाने आझाद गोमंतक दलासारख्या संघटनांना बळ मिळाले. दीनानाथ मंगेशकर यांचेही गोव्यातील सांस्कृतिक कार्य आणि नाट्य चळवळींद्वारे स्वातंत्र्याच्या विचारांना चालना देण्याचे काम केले होते.
(हेही वाचा – Deenanath Mangeshkar Charity Hospital : मंगेशकर कुटुंबावर वडेट्टीवारांचा आघात; अजित पवारांचा पलटवार)
हिंदुत्वनिष्ठता आणि सामाजिक कार्य यांचा समतोल साधणाऱ्या मंगेशकर कुटुंबाला (Mangeshkar Family) अनेकदा राजकीय हेतूंनी लक्ष्य केले जाते, असा दावा त्यांचे समर्थक करतात. गोवा मुक्ती संग्रामातील त्यांचे योगदान आणि देशभक्तीचे कार्य यांचा गौरव व्हायला हवा, अशी भावना व्यक्त होत आहे. या वादामुळे मंगेशकर कुटुंबाच्या कार्याचा पुन्हा एकदा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे, जेणेकरून त्यांच्या योगदानाला योग्य सन्मान मिळेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community